आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इनडेप्थ स्टोरी:थकबाकी मागणाऱ्यांना सुशील करायचा मारहाण; स्टेडियम होते गुंडांचा अड्डा; प्रशासक पदापासून सुरू झाले होते पहिलवानाचे पतन

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ना पोलिसांनी ऐकले ना सतपाल महाबलींनी

ऑलिम्पिक पदकविजेता पहिलवान सुशीलकुमारची पोलिस कोठडी आणखी चार दिवस वाढली आहे. त्याचा मित्र प्रिन्स माफीचा साक्षीदार होण्यास तयार आहे. पहिलवान सागर राणाला मारहाण करताना सुशीलचा जो व्हिडिओ समोर आला आहे तो प्रिन्सनेच काढला होता. गुन्हेगारी विश्वात सुशीलचा उदय अचानक झालेला नाही. ज्या छत्रसाल क्रीडांगणात झालेली मारहाण व सागर राणाच्या मृत्यूनंतर सुशील अचानक चर्चेत आला त्या क्रीडांगणाचा प्रशासक झाल्यानंतर त्याच्या पतनाला सुरुवात झाली. दीड वर्षापासून छत्रसाल क्रीडांगण गुंडागर्दीचे केंद्र झाले होते.

पहिलवानांना राहण्याची परवानगी नसतानाही येथे ३०० पहिलवान अवैधरीत्या राहत. त्यात २०० वरिष्ठ असून त्यांच्या देखरेखीसाठी कोणतीही व्यवस्था नाही. गुंडांची गर्दी पाहून चांगल्या घरचे लोक त्यांच्या मुलांना या क्रीडांगणात जाऊ देत नव्हते. सुशील आणि त्यांचे गुंड क्रीडांगणात रोजच लोकांना बाेलावून मारहाण करत. एवढेच नव्हे तर कुस्ती शिकायला आलेल्या मुलांच्या आहाराचा पैसादेखील सुशील आणि त्याचे साथीदार हडप करायचे.

मुलांच्या आहारासाठीची रक्कम सुशीलने ढापली, उधारी मागितल्याने दुकानदारास घरातून नेले; क्रीडांगणात ४० पहिलवानांनी मारहाण केली. मॉडेल टाऊनमध्ये क्रीडांगणासमोर किराणा दुकान चालवणारे सतीश गोयल सांगतात की, १८ वर्षांपासून क्रीडांगणात किराणा सामना देत होतो. दरमहा १० तारखेला हिशेब व्हायचा. मी उधारीचे ४.५० लाख मागायला गेलो तेव्हा सुशीलने टाळाटाळ केली. सुशीलने सर्वांकडून पैसे घेतले असल्याचे मुलांकडून समजले. मी तगादा लावला तेव्हा सुशीलचा गुंड अशोकने मला घरातून क्रीडांगणात नेले. मी विनवणी केली. पैसे न मिळाल्यास मी ठार मरेन. म्हणालो. त्यावर मर, असे सांगत सुशीलने मारहाण केली. तेथे उपस्थित सर्व ४० जणांनी हल्ला केला. त्यात काही सुशीलचे गुंड आणि काही पहिलवान होते.

सुशीलच्या अहंकाराने सर्व वाया गेले
क्रीडांगणात अनेक वर्षे स्वयंपाकी राहिलेले वीरपाल सांगतात, कोणत्याही पहिलवानात सुशीलसारखा अहंकार पाहिला नाही. सुशीलला वाटले त्याला नोकरीवर ठेवायचा आणि वाटले तर त्याला क्रीडांगणात पायही ठेवू देत नसे. मी पगार मागताच मला दारातही येऊ नको, असे सांगून टाकले.
सुशीलला शनिवारी कोर्टात हजर करण्यात आले.

अशोक आणि धर्मेंद्रने सुशीलला संपवले
आंतरराष्ट्रीय पदकविजेते कुस्ती प्रशिक्षक विरेंदर सांगतात की, सुशील वर्गमित्र तसेच साडूही आहे. सुशीलचे सासरे माझ्या पत्नीचे मामा आहेत. सुशील आणि सागरचे २०१३ पासूनच चांगले नाते होते. कोणतीही स्पर्धा नव्हती. अशोक आणि धर्मेंद्रने सुशीलला संपवले. ते दोघे क्रीडांगणात नोकरीला नव्हते, मात्र २४ तास सुशीलसोबत राहायचे. त्यामुळेच आज सुशील अटकेत असून हे दोघे आता क्रीडांगणात पायही ठेवू शकत नाहीत.

ना पोलिसांनी ऐकले ना सतपाल महाबलींनी
गोयल सांगतात, मारहाण होत असल्याचे पाहून लाकडाचे २ लाख रु. द्यायला आलेला पळून गेला. मी कसा तरी घरी गेलो. दोन दिवसांनी पोलिसांत गेलो असता एफआयआर न घेता मला अर्ज द्यायला सांगितले. तेव्हापासून मी पोलिसांत फेरे मारत आहे. मी सुशीलचे गुरू व सासरे सतपाल महाबली यांना फोन केला, मात्र तेही गप्प बसले. कुस्ती प्रशिक्षक विरेंदर सांगतात की, सतीशला उधारी द्यायची आहे हे सत्य आहे. मी २०१७ मध्ये ८ लाखांची उधारी मुश्किलीने दिली

सतीश गोयल त्यांची व्यथा सांगत असतानाच दुसऱ्या दुकानाचे सक्सेना तेथे आले. त्यांनाही ही घटना माहिती होती. ते म्हणाले, जोपर्यंत सुशीलसारख्या लोकांना पोलिसांचा आश्रय आहे तोपर्यंत काहीही होणार नाही. राजधानीत कायदा व सुव्यवस्थेची स्थिती खूपच वाईट आहे. त्याच वेळी मॉडल टाऊनचे राजेंद्र गुप्ता किराणा घेताना चर्चा ऐकू लागले. राजेंद्र गुप्ता म्हणाले, त्यांचा १४ वर्षांचा नातू क्रीडांगणात बास्केटबाॅल खेळायला जायचा. मात्र तेथील गुंडगिरी पाहून वाटले की तो तेथे जात राहिला तर तो वाया जाईल किंवा काहीतरी वाईट घडेल.

तत्काळ क्रीडांगणात जाणे बंद केले. असे अनेकांना करावे लागले. गोयल यांची घटना समजली तेव्हापासून क्रीडांगणासमोरून जायला भीती वाटायची. गोयल यांच्या तक्रारीची चौकशी करणारे मॉडल टाऊन पोलिस ठाण्याचे अधिकारी बनवारीलाल भारद्वाज सांगतात की, आधी का व कसा गुन्हा दाखल झाला नाही हे सांगता येणार नाही. माझ्याकडे आता चौकशी आली. सर्वांचे जबाब घेऊन मी गुन्हा दाखल करेल. त्यांना मारहाण झाली तेव्हाच न घाबरता वैद्यकीय चाचणी करायची होती. अशा पहिलवानांना साहित्य लांबच, एक ग्लास पाणीही देऊ नये.

बातम्या आणखी आहेत...