आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shyam Prakash Singh Gautam Converted To Islam At The Age Of 20, He Converted More Than 350 People In 1 Year

हिंदू गौतम ते मौलाना उमर बनण्याची गोष्ट:20 वर्षांचा असताना श्याम प्रकाश गौतमने इस्लाम स्विकारला, एका वर्षात 350 पेक्षा जास्त लोकांचे केले धर्मांतर

लखनऊएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
श्याम प्रकाश सिंह गौतम उर्फ मोहम्मद उमर गौतम - Divya Marathi
श्याम प्रकाश सिंह गौतम उर्फ मोहम्मद उमर गौतम
  • वाचा मोहम्मद उमर गौतमची गोष्ट...

उत्तर प्रदेश एटीएसने धर्मांतर प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. लखनऊमधून अटक झालेल्या दोन मौलानापैकी एक हिंदू होता. श्याम प्रकाश सिंह गौतम असे त्याचे मुस्लिम होण्यापूर्वीचे नाव होते. मुस्लिम धर्म स्विकारल्यानंतर त्याने आपले नाव मोहम्मद उमर गौतम ठेवले. गौतमने 20 वर्षांचा असताना नैनीतालमध्ये मुस्लिम धर्म स्विकारला होता.

2 वर्षांपूर्वी यूट्यूबवर अपलोड झालेल्या व्हिडिओमध्ये उमर गौतम स्वतः सांगतो की, ते 6 भाऊ आहेत. त्याचा राजपूत कुटुंबात जन्म झाला आणि त्याचे संपूर्ण कुटुंबिय यूपीतील फतेहपुर जिल्ह्यात राहतात. ते सर्वजण अजूनही हिंदूच आहेत.

वाचा मोहम्मद उमर गौतमची गोष्ट...

व्हिडिओत मोहम्मद उमर गौतम सांगतो की, 'मी फतेहपूर जिल्ह्यातला आहे. 1964 मध्ये माझा जन्म झाला होता आणि 1984 मध्ये मुस्लिम धर्म स्विकारला. माझे आधीचे नाव श्याम प्रकाश सिंह गौतम होते. माझ्या मोठ्या भावांचे नावे उदय राज सिंह गौतम, उदय प्रताप सिंह गौतम, उदय नाथ सिंह गौतम आहेत. आम्ही सहा भाऊ आहोत. मी चौथ्या नंबरचा आहे. श्रीनाथ सिंह गौतम आणि ध्रुव सिंह गौतम माझ्यापेक्षा लहान आहेत.

मोहम्मद उमर गौतम व्हिडिओत पुढे म्हणतो की, मला कधीच वाटले नव्हते की, मी माझे नाव बदलेल. मला मुस्लिम धर्माबद्दल काहीच माहिती नव्हती. मी लहानपनापासून हिंदूमध्ये जातीय भेदभाव पाहिला. मी आधी ठाकुर समाजातील होतो. मी उच्च वर्णीय असल्याचे मला नेहमी सांगितले जायचे. हा जातीय भेदभाव पाहून मला खूप त्रास व्हायचा.

माझे सुरुवातीचे शिक्षण फतेहपूरमध्ये झाले, त्यानंतर इंटरमीडिएटसाठी इलाहाबादला गेलो. तेथून बीएससी अॅग्रीकल्चर शिकण्यासाठी नैनीतालमध्ये गेलो. तिथे हॉस्टेलमध्ये राहत असताना नासिर खानशी ओळख झाली. बीएससीच्या अंतिम वर्षात असताना माझ्या पायाला दुखापत झाली होती. तेव्हा नासिरने सायकलवरुन मला हॉस्पिटलमध्ये नेले होते. तेव्हापासून आमची मैत्री अजून घट्ट झाली.

मी आणि नासिर प्रत्येक मंगळवारी मंदिरात जायचो. दिड दोन वर्षे हा नित्यक्रम सुरुच होता. त्यानंतर मी कुरान वाचली. यानंतर 1984 मध्ये एमएससीचे शिक्षण घेत असताना मी मुस्लिम धर्म स्विकारला. कॉलेज आणि हॉस्टलमध्ये सर्वांना माझ्या धर्मपरिवर्तनाबाबत माहिती होती. नैनितालनंतर मी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात इस्लामिक स्टडीजमध्ये एमए केले.

दिल्लीमध्ये इस्लामिक दावा सेंटर चालवायचा गौतम उमर
उमर गौतमने दिल्लीमध्ये इस्लामिक दावा सेंटर सुरू केले होते. तिथे तो लोकांना स्वतःची हिंदू धर्मातून मुस्लिम धर्मात येण्याची गोष्ट सांगून इतरांना मुस्लिम धर्म स्विकारण्यासाठी मोटिव्हेट करायचा. उमरने पोलिसांच्या चौकशीत सांगितले की, त्याने 1 वर्षात 350 पेक्षा जास्त लोकांचे धर्म परिवर्तन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...