आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sidhu Moose Wala Murder; Lawrence Bishnoi Lawyer On Punjab Police | Marathi News

सिद्धू मुसेवाला हत्याकांड:लॉरेन्सच्या वकिलाचा आरोप- माझ्या अशिलाला थर्ड डिग्री टॉर्चर केले जात आहे

चंदीगड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी तिहार तुरुंगातून पंजाबमध्ये आणलेल्या गँगस्टर लॉरेन्सच्या वकिलाने पंजाब पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. वकील विशाल चोप्रा यांनी सांगितले की, लॉरेन्सला चौकशीत थर्ड डिग्री टॉर्चर केले जात आहे. पंजाब पोलीस ऑन कॅमेरा चौकशी करत नाहीत. लॉरेन्सला कोणालाही भेटू दिले जात नाही. त्याविरोधात ते न्यायालयात जाणार आहेत. तिथे पंजाब पोलीस आणि सरकारला उत्तर द्यावे लागेल.

लॉरेन्सचे वकील विशाल चोप्रा.
लॉरेन्सचे वकील विशाल चोप्रा.

14 जून रोजी दिल्लीतून पंजाब पोलिसांने आणले होते
लॉरेन्सचे वकील विशाल चोप्रा यांनी सांगितले की, पंजाब पोलिसांनी त्यांच्या अशिलाला पटियाला हाऊस कोर्टातून ट्रान्झिट रिमांडवर 14 जून रोजी मानसा येथे नेले होते. पंजाबचे अॅडव्होकेट जनरल त्यांच्या टीमसह कोर्टात हजर झाले होते. ज्यामध्ये पंजाब पोलिसांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. माझ्या अशिलाच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली होती.

लॉरेन्सच्या वकिलाशिवाय कोर्टात हजर करण्यात आले
ते म्हणाला की, मानसा येथे नेल्यानंतर पोलिसांनी लॉरेन्सला पहाटे ४ वाजता न्यायदंडाधिकारी यांच्या घरी हजर केले. त्यावेळी लॉरेन्सच्या बाजूने एकही वकील उपस्थित नव्हता. आम्ही तिथे असणे आवश्यक होते. आम्ही सकाळी कोर्टाच्या कामाची तयारी करत होतो, त्यांनी रात्रीच लॉरेन्सला हजार केले. तेथून लॉरेन्सची 7 दिवसांची कोठडी घेण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत आहे सरकार
रिमांड दरम्यान पंजाब पोलिस अनेक प्रकारचे उल्लंघन करत आहेत. या प्रकरणी ज्यावेळी रिमांड घेण्यात येईल, त्यावेळी त्याची व्हिडिओ कॅमेऱ्यासमोर चौकशी करण्यात यावी. हे सर्वोच्च न्यायालयाच्या परमवीर सिंग विरुद्ध बलजीत सिंग प्रकरणाच्या निर्णयाचे उल्लंघन आहे. चौकशीदरम्यान कॅमेरा असणे आवश्यक असल्याचे त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. माझ्या क्लायंटला थर्ड डिग्री टॉर्चर केले जात आहे. लॉरेन्सच्या जीवाला धोका आहे.

लॉरेन्सच्या वकिलाला भेटण्याचा अधिकारही काढून घेण्यात आला
मी पंजाब पोलीस आणि सरकारला सांगतोय की, तुम्ही हिंसा करत आहात. उद्या कोर्टात याचे उत्तर द्यावे लागेल. त्याविरोधात मी न्यायालयात रिट दाखल करणार आहे. न्यायालय व्हिडिओ मागवणार. डॉक्टरांचे पथक बोलावून लॉरेन्सचे मनमानी पद्धतीने मेडिकल केले जात आहे. CrPC 41(D) मध्ये माझ्या क्लायंट लॉरेन्सला त्याच्या पसंतीच्या वकिलाला भेटण्याचा अधिकार आहे. त्याची बदनामी केली जात आहे. कोणालाही भेटू दिले जात नाही. लॉरेन्सवर करण्यात येत असलेली क्रूरता पोलिसांना लपवायची आहे.

बातम्या आणखी आहेत...