आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येतील मुख्य आरोपीला आता अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. खुद्द मुख्यमंत्री भगवंत मान यांनी याला दुजोरा दिला आहे. अमेरिकेची गुप्तचर संस्था FBIने गृह मंत्रालयाच्या माध्यमातून पंजाब पोलिसांशी संपर्क साधल्याची माहिती आहे. एफबीआयने गँगस्टर गोल्डी ब्रारची माहिती आणि त्याच्यावर पंजाबमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांची तपशीलवार माहिती मागवली आहे.
विशेष म्हणजे भारताच्या गुप्तचर यंत्रणांना दोन दिवसांपूर्वी गोल्डी ब्रारच्या अटकेची माहिती मिळाली होती. 20 नोव्हेंबरपासून अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआय त्याच्यावर नजर ठेवून होती आणि त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे. वास्तविक, भारत सरकारच्या दबावानंतर गोल्डी कॅनडातून अमेरिकेत पळून गेला होता. राजकीय आश्रय घेण्यासाठी अमेरिकेत पोहोचण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु भारताने जारी केलेल्या रेड कॉर्नर नोटीसमुळे त्याला ताब्यात घेण्यात आले.
6 महिने लागू शकतात
तज्ज्ञांच्या मते, गोल्डी ब्रारला भारतात आणणे पंजाब सरकारसाठी अजूनही सोपे नाही. भारत सरकारने गोल्डीला रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. त्याला आरोपी मानले जात आहे, दोषी नाही. सध्या गोल्डी राजकीय आश्रय मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. जर त्याने अर्ज केला तर अमेरिका त्याची सुनावणी करू शकते. या दरम्यान, त्याला भारतात आणणे अधिक कठीण होणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी स्वतः अटकेची पुष्टी केली
गोल्डी ब्रारला अटक झाल्याची माहिती भारताच्या गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती. भारत सरकार आणि अमेरिका सरकारने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, पण पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी स्वतः गुजरातमधील निवडणूक प्रचारादरम्यान गोल्डी ब्रारला अटक केल्याचे मान्य केले होते, मात्र विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून याला राजकीय स्टंट म्हटले जात आहे.
गोल्डी हा सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील मुख्य आरोपी
सिद्धू मुसेवाला यांची मे महिन्यात हत्या झाली होती. स्वत: गोल्डी ब्रारने सोशल मीडियावर आपला गुन्हा कबूल केला आणि त्यामागचे कारण सांगितले होते. सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंग हे सतत पंजाब सरकारवर दबाव आणत आहेत. महिनाभरापूर्वी त्यांनी पंजाब सरकारला इशारा दिला होता की, पोलिसांनी काही केले नाही तर केस मागे घेऊन देश सोडून जातील. नुकतेच बलकौर सिंह यांनी पंजाब सरकारकडे गोल्डी ब्रारच्या अटकेवर 2 कोटी रुपयांची घोषणा करण्याची मागणी केली आणि सरकारकडे पैसे नसतील तर ते देऊ असेही सांगितले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.