आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:गोल्डी ब्रार कॅनडात मोस्ट वॉन्टेड घोषित, लॉरेन्सचा विश्वासू टॉप-25 गुन्हेगारांच्या यादीत; सिद्धू मुसेवालाची केली होती हत्या

अमृतसरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा सूत्रधार गँगस्टर सतींदरजीत सिंग उर्फ गोल्डी ब्रारचा भारतानंतर कॅनडातील मोस्ट वाँटेड गुन्हेगारांच्या यादीत समावेश झाला आहे. त्याचे नाव कॅनडा सरकारच्या "बी ऑन द लुक आउट" (BOLO) यादीत टाकण्यात आले आहे. गोल्डी ब्रार कुख्यात गँगस्टर लॉरेन्सचा विश्वासू आहे. तो लॉरेन्स तिहार तुरुंगात असल्यामुळे परदेशातून त्याची टोळी चालवतो.

कॅनडा सरकारने फरार गुन्हेगारांच्या या यादीत गोल्डी ब्रारला 15 वे स्थान दिले आहे. रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांच्या (RCMP) निर्देशांनुसार, त्याचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. यासाठी इंटरपोलनेही कॅनडा पोलिसांकडे अशी विनंती केली होती.

इंटरपोलच्या वेबसाइटनुसार, गोल्डीला रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. ती भारत सरकारच्या आदेशानुसार जारी करण्यात आली होती. गोल्डी ब्रार भारताला फार दिवसांपासून हवा आहे. गोल्डी ब्रारवर खून, गुन्हेगारी कट व अवैध शस्त्रास्त्रांचा पुरवठा, खुनाचा प्रयत्न, गुन्हेगारी कटात बेकायदेशीर शस्त्रे पुरवणे आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

कॅनडाने जारी केलेली 25 मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांची यादी...

गोल्डी ब्रारचे कॅनडातून पलायन
गोल्डी ब्रार सध्या अमेरिकेत लपल्याची माहिती आहे. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, मुसेवालाच्या हत्येच्या वेळी गोल्डी ब्रार कॅनडामध्ये होता. मुसेवालाच्या हत्येनंतर तो भारतीय गुप्तहेर संस्था व मुसेवालाच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आला. कुणीतरी आपला ठावठिकाणा उघड करेल, अशी भीती त्याला वाटत होती. यामुळे काही दिवसांपूर्वीच तो कॅनडातून अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील फ्रेस्नो शहरात पळून गेला होता. तिथे त्याने 2 वकिलांच्या मदतीने राजाश्रय मिळवण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा आहे.

गोल्डी ब्रारला अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. त्याला 20 नोव्हेंबर किंवा त्यापूर्वी डिटेन केल्याची माहिती होती. अमेरिकन तपास संस्था एफबीआयने यासंबंधी भारतीय एजन्सींशी चर्चा केल्याचा दावाही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. गोल्डी ब्रार विरोधात 2 जुन्या प्रकरणांत यापूर्वीच रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे.

गोल्डी ब्रारच्या गँगस्टर बनण्याची स्टोरी 4 मुद्यांत...

1. युवा नेते गुरलालच्या हत्येनंतर कॅनडात पळाला
गोल्डी ब्रारचा गुन्हेगारीच्या जगात प्रवेश त्याचा चुलत भाऊ गुरलाल ब्रारच्या हत्येनंतर झाला. गोल्डीचा चुलत भाऊ गुरलाल ब्रार हा लॉरेन्सचा विश्वासू होता. पंजाब विद्यापीठात शिकत असताना त्याने लॉरेन्सच्या मदतीने स्टुडंट ऑर्गनायझेशन ऑफ पंजाब युनिव्हर्सिटी (SOPU) नामक संघटना स्थापन केली. ऑक्टोबर 2020 मध्ये चंदीगडच्या औद्योगिक परिसरात त्याची हत्या करण्यात आली होती.

2. भावाच्या मारेकऱ्याचा केला होता मर्डर
गोल्डीला त्याच्या भावाच्या मारेकऱ्याचा मर्डर करायचा होता. यासाठी तो वेडापिसा झाला होता. याच काळात तो लॉरेन्सच्या जवळ आला. गुरलालच्या हत्येप्रकरणी युवक काँग्रेसचे नेते गुरलाल पैलवानचे नाव पुढे आले होते. त्याची गोल्डी ब्रारने हत्या केली होती. त्यानंतर पोलिस त्याच्या मागे लागले. त्यानंतर काही दिवसांनी ब्रार कॅनडाला पळून गेला.

3. वडिलांची सक्तीची निवृत्ती
गोल्डी ब्रारचे वडील शमशेर सिंग पंजाब पोलिसात सहायक उपनिरीक्षक (एएसआय) होते. गुरलाल पैलवानच्या हत्येत गोल्डी ब्रारचे नाव आल्यानंतर पंजाब पोलिसांनी त्यांना निवृत्ती घेण्यास भाग पाडले. याला त्याच्या वडिलांनीही विरोध केला नाही.

4. लॉरेन्सशी संधान साधून माजी नगरसेवकाची हत्या
गोल्डी कॅनडाला जाण्यापूर्वीच त्याची लॉरेन्सशी जवळीक वाढू लागली होती. कॅनडात बसून त्याने तुरुंगात डांबलेल्या लॉरेन्सची टोळी चालवायला सुरुवात केली. 25 फेब्रुवारी 2022 रोजी गुरुग्राममध्ये माजी नगरसेवक परमजीत ठकरान व त्याचा भाऊ सुरजीत यांची हत्या करण्यात आली होती. दारूच्या व्यवसायामुळे या दोघांचे अजय झैलदार याच्याशी शत्रूत्व होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, अजय झैलदारने लॉरेन्स व गोल्डी ब्रार यांच्याशी संधान साधून हे हत्याकांड घडवले.

परदेशातून 5 राज्यांतील नेटवर्क हाताळतो

कॅनडामध्ये बसून गोल्डी ब्रार अजूनही पंजाब, हरियाणा, हिमाचल, एनसीआर व राजस्थानातील लॉरेन्सचे नेटवर्क चालवतो. लॉरेन्स तुरुंगात गेल्यानंतर त्याने टोळी मजबूत केली. त्यानंतर खंडणी, खून, हत्येचा प्रयत्न आदी प्रकरणांमध्ये गोल्डीचे नाव येऊ लागले. याशिवाय गोल्डीने पंजाबमध्ये शस्त्रास्त्र पुरवठ्याची साखळी बनवणे सुरू केले. गत काही दिवसांत गोल्डीचे अनेक साथीदार अमृतसर व भटिंडा येथे पकडले गेले. ते शस्त्रास्त्रांच्या तस्करीत सहभागी होते.

गोल्डी ब्रारने दिली मुसेवालाच्या हत्येची कबुली

गतवर्षी 29 मे रोजी सिद्धू मुसेवालाची हत्या झाली होती. त्यानंतर सोशल मीडियावरील एका व्हिडिओद्वारे ब्रारने मुसेवालाच्या हत्येची कबुली दिली. तो म्हणाला - लॉरेन्सचा महाविद्यालयीन मित्र विकी मिड्दुखेडाच्या हत्येत मुसेवालाचा हात होता. मुसेवालाचा व्यवस्थापक शरणदीपने शूटर्सना आश्रय देऊन टार्गेटची माहिती दिली. पोलिसांनी मुसेवालावर कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे नाईलाजाने त्याची हत्या करावी लागली. मानसाच्या जवाहरके गावात मुसेवालाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.