आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sidhu Moosewala Murder | Moosewala Father Balkaur Singh Threat Lawrence Bishnoi Gang | Marathi News

सिद्धू मुसेवालाच्या वडिलांनी धमकी:लॉरेन्स आणि जग्गू भगवानपुरियाच्या सुरक्षेविषयी काही बोलाल, तर जीवे मारू

चंदीगड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुख्यात गँगस्टर लॉरेन्स टोळीने पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर आता वडिलांना धमकी दिली आहे. लॉरेन्स टोळीच्या शूटरच्या नावाने पाठवलेल्या मेलमध्ये लिहिले आहे की मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंह यांनी लॉरेन्स आणि जग्गू भगवानपुरिया यांच्या सुरक्षेबाबत काहीही बोलू नये. मुसेवालाची हत्या करणारे शूटर जगरूप रूपा आणि मनप्रीत मन्नू यांचे एन्काउंटरही मुसेवाला यांच्या वडिलांच्या दबावाखाली झाल्याचे टोळीने म्हटले आहे. ही धमकी समोर येताच पंजाब पोलिसांनी गुप्त तपासणी सुरू केली आहे.

ही धमकी देण्यात आली
शूटर एजे लॉरेन्सच्या नावाने ही धमकी सिद्धू मुसेवाला यांच्या ई-मेल आयडीवर पाठवण्यात आली आहे. हा इशारा सोपू ग्रुपने दिला आहे. धमकी देणाऱ्याने लिहिले - "सुनो सिद्धू मुसेवाला के बाप, लॉरेन्स, जग्गू भगवानपुरिया आमच्या भावांच्या सुरक्षेबाबत काही बोललास तुला काही कळण्याच्या आत मारून निघून जाऊ. तू आणि तुझा मुलगा या देशाचे मालक नाहीत. तुम्हाला वाटेल त्याला सुरक्षा मिळणार नाही. तुच्या मुलाने आमच्या भावांना मारले आणि आम्ही तुझ्या मुलाला मारले. मनप्रीत मन्नू आणि जगरूप रूपा यांचे फेक एन्काउंटर झाल्याचे आम्ही विसरलेलो नाहीत. तूसुद्धा विसरू नको कारण हे सर्व तुझ्या दबावाखाली घडले आहे. तुलाच एकच सांगतो, जास्त बोललात तर तुझी स्थिती सिद्धूपेक्षा वाईट होईल."

मुसेवालाच्या वडिलांनी अनेकवेळा सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे
सिद्धू मुसेवालाच्या वडिलांनी गँगस्टर लॉरेन्स आणि जग्गू भगवानपुरिया यांच्या सुरक्षेचा मुद्दा अनेकदा उपस्थित केला आहे. बलकौर सिंह म्हणाले की, जो कायदा सामान्यांसाठी बनवला गेला, त्याचा फायदा गुंड घेत आहेत. लॉरेन्स आणि जग्गूवर अनेक वॉरंट असूनही त्यांना सुरक्षा देण्यात येत आहे. ते सामान्य माणसाप्रमाणे कोर्टात का जात नाहीत?

बंबीहा टोळीकडून लॉरेन्स टोळीला धोका
लॉरेन्स टोळीला त्याचा कट्टर शत्रू, बांबिहा टोळीपासून धोका आहे. बंबीहा गँगने लॉरेन्स, जग्गू आणि गायक मनकीरत औलख यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. उच्च सुरक्षेमुळे तो लॉरेन्स आणि जग्गूला मारण्यास सक्षम नसल्याचेही त्याने सांगितले. सुरक्षेत काही चूक झाली तर त्यांच्या म्होरक्याला धोका होऊ शकतो, हीच लॉरेन्स टोळीची चिंता आहे.

बातम्या आणखी आहेत...