आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Musewala's Parents Under House Arrest; Berry's Information That The Police Had Taken The Two To The Village, They Were Going To Campaign For The Jalandhar By election

काँग्रेसचा दावा:मुसेवालाचे आई-वडिल नजरकैद; पोलिसांनी दोघांना गावी नेल्याची बेरी यांची माहिती, जालंधरला प्रचारात येणार होते

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबमध्ये, काँग्रेस पक्षाने प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या पालकांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याचा दावा केला आहे. जालंधर काँग्रेस नेते राजिंदर बेरी यांनी सांगितले की, बलकौर सिंह आणि चरण कौर यांचा जालंधरमध्ये दुपारी 1.30 वाजता एक कार्यक्रम होता, परंतु त्यांनी अनेक तास फोन उचलला नाही किंवा कोणतेही उत्तर मिळले नाही.

बेरी यांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांना माहिती मिळाली आहे की, ‘जालंधरला येत असलेल्या बलकौर सिंग आणि चरण कौर यांना पोलिस अधिकाऱ्यांनी मध्यभागी अडवले आणि त्यांना अज्ञात स्थळी नेले. दोघांनाही त्यांच्या मूसेवाला गावात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. जालंधर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी लोकांना भेटू नये म्हणून हे केले गेले.’

दरम्यान, काँग्रेस नेते राजिंदर बेरी यांच्या आरोपांवर पंजाब किंवा जालंधर पोलिसांचा कोणताही अधिकारी काहीही बोलायला तयार नाही.

सिद्धू मुसेवाला याची मे 2022 मध्ये गँगस्टर लॉरेन्सच्या गुंडांनी हत्या केली होती. बलकौर सिंग आणि चरण कौर आपल्या मुलाच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी जालंधर लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या भागात इन्साफ यात्रा काढत आहेत. मुसेवाला याच्याा हत्येला या महिन्यात 29 मे रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे.

दोन दिवसांपूर्वीही पोलिसांनी जमावाला पळवून लावले होते

इन्साफ यात्रेदरम्यान जालंधर लोकसभा मतदारसंघात त्याचे पालक भेट देत असताना मूसवालाचे चाहते जमतात. दोन दिवसांपूर्वी या दोघांना भेटण्यासाठी जालंधर शहरातील रामामंडी उड्डाणपुलाखाली मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी घोषणा करुन लोकांना तेथून निघून जाण्यास सांगितले आणि जमाव जबरदस्तीने पांगवण्यात आला होता.

पोलिसांच्या या कारवाईचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये लोकांनी घटनास्थळी उपस्थित पोलिसांना प्रश्न केल्यावर ते फक्त अधिकाऱ्यांचे आदेश असल्याचे सांगत आहेत. पोलिसांनी सांगितले की, मुसेवालाच्या पालकांना गर्दी जमवण्याची परवानगी नव्हती.

जालंधर येथील काँग्रेस नगरसेवकाचे कार्यालय जायचे होते

मुसेवालाचे पालक सोमवारी जालंधरच्या सर्वात गजबजलेल्या भगवान वाल्मिकी चौक (ज्योती चौक) भागातील काँग्रेस नगरसेविका शॅरी चढ्ढा यांच्या कार्यालयात येणार होते. आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी येथील लोकांना संबोधित करण्याचा आणि लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता.

न्यायासाठी लढा सुरूच राहील

मूसवाला यांचे वडील बलकौर सिंग आणि आई चरण कौर, जे जालंधर लोकसभा मतदारसंघात अनेक दिवसांपासून इन्साफ यात्रा काढत आहेत. यात ते पंजाबी कमजोर नसल्याचे सांगत आहेत. ते म्हणाले की, ‘पंजाबी लोकांना आपल्या हक्कांसाठी कसे लढायचे ते माहिती आहे. आमच्या मुलाला न्याय मिळावा यासाठी आम्ही लढा उभारला आहे. न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाहीत.’

आई चरण कौर म्हणाल्या की, ‘शत्रू कोणतीही कसर सोडत नाही, परंतु वाहेगुरुंनी आपल्या सर्वांना त्याच्याशी लढण्याची प्रेरणा दिली आहे. न्याय मिळेपर्यंत आम्ही लढत राहू. शत्रूंनी माझ्या मुलाला निर्दयपणे मारले. आम्ही न्यायासाठी सरकारकडे याचना करत असताना 32-33 जणांना अटक केल्याचे उत्तर त्यांच्याकडून मिळते.’

चरण कौर म्हणाल्या की, ज्यांच्याबद्दल आपण बोलत आहोत त्यांनी कट रचून मुसेवाला याला मारले, मग सरकार त्यांना अटक का करत नाही? काही लोक माझ्या मुलाच्या कामावर नाराज होते. 4 वर्षांपासून ते त्याला पराभूत करण्याचा प्रयत्न करत होते. सर्व युक्त्या करून पाहिल्या पण अयशस्वी ठरल्यावर त्यांनी शेवटी माझ्या मुलाला मारले.’

संदीप अंबिया, चावला, गुरजंत यांचा काय दोष होता?

बलकौर सिंग म्हणाले की, पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे मोडकळीला आली आहे. पंजाबमधील तरुणांना पकडून दिब्रुगडला पाठवले जात आहे. तर तुरुंगात बसलेल्या गुंडांना इंटरनेटपासून सर्व सुविधा पुरवल्या जात आहेत. तुरुंगातून दररोज गुंड आपले व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत.

मुसेवालाच्या पालकांनी सांगितले की, पंजाबमध्ये जो कोणी मेहनत करून 4 पैसे कमवून जगण्याचा प्रयत्न करतो, त्याचा खंडणीखोर पाठलाग करतात. तरनतारनच्या गुरजंतने आयुष्यभर ढाबा चालवला. काबाडकष्ट करून पैसे मिळवले आणि कपड्यांचा व्यवसाय सुरू केला, त्यानंतर खंडणीखोरांनी त्याचा पाठलाग केला. पैसे न दिल्याने त्याची सार्वजनिक ठिकाणी हत्या करण्यात आली. टिमी चावला यांनी कष्ट करून नकोदरमध्ये व्यवसाय उभा केला. त्याने वाहनाचा व्हीआयपी क्रमांक घेतला असता खंडणीखोर त्याच्या मागे लागले. पैसे न दिल्याने त्याचीही हत्या करण्यात आली. कबड्डीत आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेल्या संदीप नांगल आंबियाची परदेशात बसलेल्या गुंडांनी जाहीरपणे हत्या केली.