आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sidhu Moosewala Murder Case The Last Ride Thar | Moosewala Murder Case | Balkaur Singh | Punjab News

मुसेवालाची थार 6 महिन्यांनी घरी पोहोचली:चाहत्यांना हवेलीत पाहायला मिळणार; अजूनही गोळ्यांच्या खुणा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबचा गायक सिद्धू मुसेवालाचा 'द लास्ट राइड- थार' हत्येच्या सहा महिन्यांनंतर मानसा येथील हवेलीत पोहोचली आहे. गोळ्यांच्या खुणा असलेली थार पाहून बलकौर सिंग हेलावले. त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. थार चाहत्यांना पाहण्यासाठी हवेलीमध्ये लावण्याची इच्छा सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंग यांची आहे.

विशेष म्हणजे हत्येपासून सिद्धू मुसेवाला थार मानसा पोलिसांच्या ताब्यात होती. न्यायालयाच्या आदेशानुसार कार कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आली. काही दुरुस्तीनंतर ही कार मानसा येथील मूसा गावात सिद्धू मूसवाला यांच्या हवेलीत आणून उभी करण्यात आली.

थारसह पिस्तुल सुपूर्द
थार पाहून सिद्धू मुसेवालाचे वडील भावूक झाले. त्यांनी हवेलीत इतर वाहनांसह थार उभी केली आहे. थारसोबतच सिद्धू मुसेवालाचे पिस्तूलही त्याच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

रोज हजारो चाहते येतात
सिद्धू मुसेवाला यांचे घर पाहण्यासाठी दररोज हजारो चाहते मुसा गावात पोहोचतात. दर रविवारी वडील बलकौर सिंग हे चाहत्यांशी संवादही साधतात.

थारवर गोळण्याच्या खुणा
घटनेच्या दिवशी सिद्धू मुसेवाला यांच्यावर 30 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. थरावर सुमारे 30 गोळ्या झाडण्यात आल्या. घटनास्थळावरुन ज्या अवस्थेत थार मिळाली होती. तशीच ती ठेवली आहे.

शेवटची राईड
सिद्धू मुसेवाला यांचे द लास्ट राइड हे गाणे प्रसिद्ध गाण्यांपैकी एक होते. त्या गाण्याप्रमाणेच ही थारही सिद्धू मुसेवालासाठी शेवटची राईड ठरली. सिद्धू मुसेवाला यांच्याकडेही बुलेट प्रूफ कार होती. पण टायर पंक्चर झाल्यामुळे त्यांनी शेवटच्या क्षणी थार निवडली. इतकंच नाही तर त्याने आपल्या उर्वरित दोन अंगरक्षकांनाही घरी सोडले होते.

एक दिवस आधी सुरक्षा कमी
आम आदमी पार्टीचे सरकार सत्तेवर येताच त्यांनी सर्वप्रथम पंजाबच्या व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेत कपात करण्यास सुरुवात केली. 28 मे रोजीच सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षाही कमी करण्यात आली होती. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर पंजाब सरकारवर लोकांचा रोष उसळला होता.

कोण होता सिद्धू मूसेवाला ?

सिद्धू मूसेवालाचा जन्म 17 जून 1993 रोजी झाला होता. त्याचे खरे नाव हे शुभदीप सिंह सिद्धू होते. मूसेवालाचे लाखो चाहते होते. सिद्धू हे गँगस्टर रॅपसाठी लोकप्रिय होता. मूसेवाला यांची आई या गावाच्या सरपंच आहेत. मूसेवाला यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मूसावाला यांनी गायन कला शिकली होती.

हो, मीच घातल्या मुसेवालाला गोळ्या

सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या लॉरेन्स गँगनेच केली आहे. गँगस्टर लॉरेन्सचा भाचा सचिन बिश्नोईने आपणच हा खून केल्याची कबुली दिली आहे. तो म्हणाला -मी स्वतः सिद्धू मुसेवालाला गोळ्या घातल्या. याद्वारे आम्ही मोहालीत झालेल्या विक्की मिड्डूखेडाच्या हत्येचा बदला घेतला. येथे वाचा पुर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...