आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाब प्रदेश काँग्रेसमधील कलह कायम आहे. त्याचे संकेत साेमवारीही मिळाले. पक्ष नेतृत्वाने राज्य समितीची जबाबदारी साेपवल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धूने साेशल मीडियावर लिहिले, माझा प्रवास आता सुरू झाला आहे. त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका वाड्रा आणि अन्य नेत्यांचे आभार मानले, पण मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा उल्लेख केला नाही. मुख्यमंत्र्यांनीदेखील बुधवारी पक्षाच्या आमदारांची बैठक बाेलावली आहे, परंतु सिद्धू यांना आमंत्रण दिले नाही. याआधी प्रदेश काँग्रेस झाल्यानंतर सिद्धूच्या सन्मानार्थ काँग्रेस नेते तृप्त बाजवा यांनी घरी चहापान आयाेजित केले हाेते. यात अमरिंदर साेडून सर्व आमदार व नेते उपस्थित हाेते.
राजकीय समीकरण : पंजाबमध्ये आता दलित-हिंदू राजकारण केंद्रात
पंजाबमध्ये ७ महिन्यांनंतर निवडणुका आहेत. दलित व हिंदू या पंजाबीबहुल सीमा राज्याचे राजकारण केंद्रात आहे असे प्रथमच हाेत आहे. सर्वांच्या नजरा ७० % दलित- हिंदू व्हाेट बँकवर आहेत. यात काँग्रेस व अकाली दलाचा समावेश आहे.
अकाली दल : पंथ आणि शिखांचे प्रतिनिधित्व करणारा हा पक्ष मानला जातो. परंतु आता पक्षाने बसपाशी करार केला आहे. हिंदू उपमुख्यमंत्र्यांचे कार्डही वापरले आहे.
भाजप : पंजाबमध्ये ३९ % दलित व्हाेट बँक आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने अकाली वेगळे हाेताच दलित मुख्यमंत्र्यांचा डाव खेळला. त्यानंतर बाकी पक्षांनी भाजपच्या खेळीला विराेध सुरू केला आहे.
काँग्रेस : अकाली दलाच्या हिंदू-दलित उपमुख्यमंत्री फाॅर्म्युल्याचा परिणाम हाेणार हे अमरिंदर जाणतात. त्यामुळे सामाजिक समताेलासाठी प्रदेशाध्यक्ष हिंदू असावा असा त्यांचा विचार आहे.
सिद्धूंच्या सन्मानार्थ हे चहापान, बैठक नाही : सुनील जाखड
माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी नवे प्रदेशाध्यक्ष झाल्याबद्दल सिद्धू यांचे अभिनंदन केले. जाखड यांनी साेशल मीडियावर लिहिले, पंजाबच्या लाेकांनी २०१७ मध्ये दाेनतृतीयांश बहुमत देऊन काँग्रेसवर विश्वास दाखवला हाेता. हा विश्वास आणखी भक्कम करण्याची प्रत्येक कार्यकर्ता आणि नेत्याची जबाबदारी आहे. नवे पीपीसीसी प्रमुख या नात्याने नियुक्ती झालेल्या सिद्धू साहेबांचा सन्मान करण्यासाठी तृप्त बाजवा यांनी चहापान ठेवले हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.