आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अदार पूनावालांना सिक्योरिटी:सीरम इंस्टीट्यूटच्या सीईओंना केंद्राने दिली Y दर्जाची सुरक्षा; लसीच्या किंमतीमुळे सापडले होते वादात

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यांसाठी व्हॅक्सीन महाग करण्यावर उपस्थित झाले होते प्रश्न

कोविशील्डच्या किंमतीमुळे वादात सापडलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे सीईओ अदार पूनावाला यांना वाय श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. पूनवाला यांना धोक्याची भीती लक्षात घेऊन सुरक्षा देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. आता केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) 4-5 कमांडोसमवेत 11 सुरक्षा कर्मचारी पुनावाला सोबत असतील. त्यांना ही सुरक्षा देशभर मिळेल.

SII चे डायरेक्टर (गवर्नमेंट अँड रेग्युलेटरी अफेयर्स) प्रकाश कुमार सिंह यांनी 16 एप्रिलला गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले होते. यामध्ये पूनावाला यांना सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती.

राज्यांसाठी व्हॅक्सीन महाग करण्यावर उपस्थित झाले होते प्रश्न
सीरम इंस्टीट्यूट कोरोना व्हॅक्सीन (कोवीशील्ड) बनवत आहे. नुकतीच व्हॅक्सीनच्या किंमतीविषयी इंस्टीट्यूट वादात आले होते. त्यांना राज्यांना कोवीशिल्ड 400 रुपयांमध्ये देण्याची घोषणा केली होती. तर केंद्र सरकारसाठी किंमत 150 रुपये ठेवली होती.

बऱ्याच विरोधी नेत्यांनी हा मुद्दा बनवला होता आणि सोशल मिडीयावरही वन व्हॅक्सीन वन प्राइज ट्रेंड होत होते. त्यानंतर बुधवारी, सीरम इंस्टीट्यूटने राज्यांसाठी लसीच्या किंमतीत 25% कपात करुन 300 रुपये करण्याची घोषणा केली होती.

केंद्रीय सुरक्षेचा स्तर काय?

केंद्र सरकारकडून मिळणारी सुरक्षा 6 स्तरांवर दिली जाते, म्हणजेच X, Y, Y+, Z आणि Z+ आणि एसपीजी कॅटेगिरीची सुरक्षा.

SPG: ब्यूरो ऑफ पोलिस रिसर्च आणि डेव्हलपमेंच्या रिपोर्टनुसार एसपीजी केवळ पंतप्रधान आणि इतर व्हीआयपींना सुरक्षा देते.

X: दोन वयक्तिक सुरक्षा अधिकारी (पीएसओ) 24 तास सुरक्षा करतात. याचा अर्थ असा आहे की, आठ-आठ तासांच्या शिफ्टमध्ये एकूण सहा पीएसओ तैनात असतात.

Y: दोन पीएसओ आणि एक सशस्त्र गार्ड चोवीस तास सुरक्षा देतो. एकूण 11 सुरक्षारक्षक असतात. पांच स्टेटिक ड्यूटीवर आणि 6 वयक्तिक सुरक्षेसाठी असतात.

Y+: यामध्येही Y कॅटेगरीची सुरक्षा दिली जाते. यामध्ये 11 ते 22 पीएसओ तैनात असतील. अधिकाऱ्यांनुसार कंगनाच्या पीएसओसाठी एक एस्कॉर्ट वाहन दिले जाईल.

Z: 22 सुरक्षा रक्षक असतात यामध्ये 2 ते 8 सशस्त्र गार्ड घरी असतात. दोन पीएसओ चोवीस तास राहतात. रस्त्यांवरुन प्रवास करत असताना तीन सशस्त्र जवान एस्कॉर्टमध्ये असतात.

Z+: Z कॅटेगिरीच्या सुरक्षेव्यतिरिक्त या कॅटेगिरीमध्ये एक बुलेट प्रूफ कार, तीन शिफ्टमध्ये एस्कॉर्ट आणि गरज पडल्यावर अतिरिक्त सुरक्षाही मिळते.

बातम्या आणखी आहेत...