आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sikhs Set Up Langar At Ukraine War Site To Save People From Starvation, Also Distributing Food In Trains

शिखांच्या सेवेला सलाम:रशिया- युक्रेन युद्धादरम्यान शिखांचा दिलदारपणा! भुकमारीपासून वाचवण्यासाठी लावले जाताय लंगर; ट्रेनमध्येही लोकांना वाटले जातेय जेवण

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेवाभाव हा शिखांच्या डीएनएमध्येच आहे. हेच कारण आहे की, जेव्हा जेव्हा एखादे संकट आले, तेव्हा हा समुदाय मदतीसाठी तयार असतो. देशापासून विदोशापर्यंत अनेक अशी उदारहणे आहेत, जिथे शिखांनी संकटाच्या वेळी स्वतःची चिंता न करता लोकांची मदत केली आहे. त्यांचे पोट भरण्यासाठी जेवण दिले आहे.

हाच उत्साह विदेशी धरती यूक्रेनमध्ये पाहायला मिळत आहे. येथे सिख समुदायातील लोक युद्ध स्थळावर जाऊन लोकांमध्ये लंगर वाटून त्यांची सेवा करत आहेत. ही सेवा कोणत्याही स्वार्थाशिवाय निस्वार्थ भावाने माणुसकी वाचवण्यासाठी केली जात आहे.

म्यानमारचे संकट असो, आयएसआयएसचे दहशतवादी क्षेत्र, किसान चळवळ, दिल्लीतील शाहिन बाग चळवळ, पूरग्रस्त परिसर किंवा कोरोना महामारीचे संकट अशा सर्व ठिकाणी शिख समुदायाच्या लोकांनी पुढे येऊन लोकांचे पोट भरले आहेत.

आता यूक्रेनमध्ये शिख समुदायाच्या लोकांद्वारे लंगर तयार करुन गाड्यांमध्ये नेऊन ठिकठिकाणी वाटले जात आहे. तर ट्रेनमध्ये देखील प्रवाशांना अन्न दिले जात आहे. जसे युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाले, लोकांनी बँक खात्यांमधून आपले पैसे काढून घेतले आणि स्टोर्समध्ये जाऊन ठोकमध्ये राशन खरेदी करुन आपल्या घरात स्टोअर केले.

जेणेकरुन युद्धा दरम्यान त्यांना घरातून बाहेर पडावे लागू नये आणि घरात राहून त्यांना अन्नाचा तुटवडा भासू नये. मात्र लोकांनी मोठ्या प्रमाणात साहित्य घरी नेल्याने तेथील स्टोअर रिकामे झाले आहेत.

जे लोक तिथे शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घरापासून दूर गेले आहेत त्यांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागत आहे. पुरेशी जागा नसल्यामुळे ते अन्न साठवू शकत नाही आणि त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तेथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार देखील प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत, शिखांनी तेथे राहणाऱ्या लोकांसाठी एक मोठा दिलासा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...