आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिक्कीमची राजधानी गंगटोकमध्ये मंगळवारी हिमस्खलन झाले. त्यात 7 पर्यटकांचा बळी गेला. मृतांत 4 पुरुष, 2 महिला व एका मुलाचा समावेश आहे. ही घटना दुपारी 12.20 च्या सुमारास गंगटोकला नाथु ला पासशी जोडणाऱ्या जवाहरलाल नेहरू मार्गावर घडली.
आतापर्यंत 22 पर्यटकांना बर्फाबाहेर काढण्यात आले आहे. त्यातील 11 जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना गंगगोट स्थित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
14 व्या माइलस्टोनजवळ दुर्घटना
दुर्घटना घडलेल्या भागात 13 व्या मैलाच्या माइलस्टोनपर्यंत जाण्याचा पास जारी केला जातो. त्यापुढे जाण्याची परवानगी नाही. पण हे पर्यटक जवाहरलाल नेहरू मार्गावरील 14व्या माईलस्टोनपर्यंत गेले. नेमका तिथेच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने या ठिकाणी तातडीने बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत 22 जणांची सुटका करण्यात आली. यातील 6 जणांना खोल दरीतून बाहेर काढण्यात आले.
नाथुला पास चीनच्या सीमेवर स्थित आहे. नैसर्गिक सुंदरतेमुळे येथे पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. लष्करी सूत्रांच्या माहितीनुसार, जवाहरलाल नेहरू मार्गावरील 14 व्या मैलाच्या दगडाजवळ झालेल्या हिमस्खलनात 25-30 पर्यटक अडकले होते. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (BRO) युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करून 22 जणांना वाचवले. यापैकी 6 जणांना खोल दरीतून बाहेर काढण्यात आले. जवळपास 350 जण व 80 वाहने रस्त्यातील अडचणींमुळे नाथु ला पासलगत अडकले होते.
हिमस्खलनाची भविष्यवाणी शक्य नाही
हिमस्खलन केव्हा व कुठे होईल याची अचूक भविष्यवाणी अजून वैज्ञानिकांना करता आली नाही. ते केवळ बर्फाचे ढीग तापमान व हवेच्या स्थितीवरून हिमस्खलनाच्या धोक्याचा इशारा देतात. स्कीइंगचे आयोजन होणाऱ्या काही बर्फाळ भागात हिमस्खलन कंट्रोल पथक तैनात असतात.
स्कीइंग भागातील हिमस्खलन रोखण्यासाठी गस्ती पथक स्फोटकांचा वापर करते. ते कोणत्याही धोकादायक उतार असलेल्या ठिकाणचा बर्फ तोफांनी उडवून देतात. कॅनडा व स्वित्झरलँडमदील उंच डोंगरावरील हिमस्खलन रोखण्यासाठी स्पेशल मिलिट्री तैनात असते. स्वित्झर्लंडच्या अनेक डोंगराळ गावातील घरांना वाचवण्यासाठीही मजबूत संरचना उभी केली जाते.
हिमस्खलन कशा म्हटले जाते?
पर्वताच्या उतारावरून बर्फ किंवा दगड वेगाने खाली येणे किंवा पडणे याला हिमस्खलन म्हणतात. हिमस्खलनादरम्यान, बर्फ, खडक, माती आणि इतर वस्तू वेगाने डोंगर उतारावरून खाली घसरतात.
एखाद्या पर्वताच्या उतारावरील बर्फ किंवा खडक यांसारख्या वस्तू त्याच्या सभोवतालपासून सैल होतात तेव्हा सहसा हिमस्खलन सुरू होते. यानंतर, ते उताराच्या खाली असलेल्या इतर गोष्टी गोळा करत वेगाने खाली कोसळू लागते. खडक किंवा मातीच्या हिमस्खलनाला भूस्खलन म्हणतात.
हिमस्खलनाचे 3 प्रकार आहेत:
हिमस्खलन कसे सुरू होते?
हे मुख्यतः दोन प्रकारे होते- एक- अनेकदा जेव्हा पर्वतांवर आधीच अस्तित्त्वात असलेल्या बर्फावर हिमवृष्टीमुळे वजन वाढते, तेव्हा बर्फ खाली सरकायला लागतो, ज्यामुळे हिमस्खलन होते. दुसरे- उन्हाळ्यात सूर्यप्रकाशामुळे म्हणजेच उष्णतेमुळे बर्फ वितळल्याने हिमस्खलन होते.
मोठ्या आणि पूर्ण विकसित हिमस्खलनाचे वजन 10 लाख टन किंवा 1 अब्ज किलोपर्यंत असू शकते. डोंगरावरून खाली कोसळताना त्याचा वेग ताशी 120 किलोमीटर ते ताशी 320 किलोमीटरपेक्षा जास्त असू शकतो.
हिमस्खलन सहसा हिवाळ्यात होते. विशेषतः डिसेंबर ते एप्रिल या काळात ते होण्याची शक्यता जास्त असते.
गतवर्षीच्या हिमस्खलनाच्या 3 मोठ्या घटना
जानेवारी 2022 : तिबेटमधील हिमस्खलनात 8 जणांचा मृत्यू झाला. यासंबंधीच्या वृत्तानुसार, तिबेटच्या नैऋत्य भागातील न्यिंगची शहरातील डॉक्सॉन्ग ला बोगद्याजवळ ही दुर्घटना घडली होती.
फेब्रुवारी 2022: अरुणाचल प्रदेशातील हिमस्खलनानंतर बेपत्ता झालेल्या 7 लष्करी जवानांचे मृतदेह आढळले. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, हे जवान गत 2 दिवसांपासून बर्फात अडकले होते. कामेंग सेक्टरच्या हाय अॅल्टिट्यूड क्षेत्रात (अतिउच्च भागात) ही दुर्घटना घडली होती.
नोव्हेंबर 2022: जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा माछिल भागातील हिमस्खलनामुळे 3 जवान शहीद झाले. ही घटना घडली तेव्हा 56 राष्ट्रीय रायफल्सचे 5 पाच जवान नियमित गस्तीवर होते. अधिका-यांनी सांगितले की, अपघाताची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले. पण जवानांना बाहेर काढेपर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.