आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Singal Mother Updates: A Kerala High Court Regarding A Single Mother; News And Live Updates

मुद्दा समानतेचा:पुरुषांविना काही नाही, महिलांचा हा विचार समाजव्यवस्थेचे अपयश!; केरळ उच्च न्यायालयाचे सिंगल मदर्सबद्दल महत्त्वाचे निरीक्षण

तिरुवनंतपुरम2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोर्ट म्हणाले : राज्यांनी सिंगल मदर्सच्या योजना आखाव्यात

केरळ उच्च न्यायालयाने एका निवाड्यात एकट्या माता (सिंगल मदर) आणि त्यांच्याशी समाजाचे वागणे याबद्दल महत्त्वाची टिप्पणी केली. सिंगल मदरच्या मदतीसाठी योजना तयार करण्याची आता वेळ आली आहे, असे कोर्टाने स्पष्ट केले. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या अनिता नावाच्या सिंगल मदरच्या खटल्यात न्यायमूर्ती ए. मोहंमद मुस्ताक व न्यायमूर्ती डॉ. कौसर एदप्पागाथ यांच्या पीठाने हा निवाडा केला.अनिताने आपल्या बाळाला दत्तक देण्यासाठी सरेंडर प्रक्रिया सुरू केली होती. कारण त्यांच्या आई-वडील व बाळाच्या जैविक पित्याने त्यांच्याशी असलेले संबंध संपवले होते. परंतु दुसऱ्या भेटीनंतर दोघांनी अपत्याचा ताबा घेण्यासाठी न्यायालयाचे दार ठोठावले. सिंगल मदर असणे आणि अपत्याच्या भविष्यामुळे त्यांच्यासमोर दत्तक देण्याशिवाय मार्ग नव्हता. पुरुषांच्या सहकार्याविना आपण काहीही नाही, असा विचार महिलांचा मनात येत असल्यास हे आपल्या व्यवस्थेचे अपयश म्हटले पाहिजे, असे कोर्टाने सांगितले.

लिव्ह इनचे अपत्य विवाहितांचे मानणार
लिव्ह इन रिलेशनशिपमधून जन्माला येणाऱ्या अपत्याला दत्तक देण्यासाठी आत्मसमर्पण करायचे झाल्यास त्यास विवाहित दांपत्यापासून झालेले अपत्य असे मानले जाईल, असे हायकोर्टाने नमूद केले. अनिता प्रकरणात हा निकाल आला आहे. एकट्या मातेसाठी लागू प्रक्रियेचे पालन करण्यात आले होते. कायदेशीरदृष्ट्या ते अस्थिर आहेत.

लिव्ह इननंतर वेगळे झाले, पुन्हा एकत्र आले
अनिता (नाव बदलले आहे) व जॉन लिव्ह इनमध्ये होते. पण नंतर जॉनने नाते तोडले. दोघांच्या नात्याला त्यांच्या कुटुंबांचा विरोध होता. कारण दोघेही भिन्न धर्माचे होते. अनिता काेसळल्या. त्यांनी बाळाला बालकल्याण समितीकडे सोपवले. अनिता ,जॉन पुन्हा एकत्र आले. दोघांनीही अपत्याचा ताबा घेण्यासाठी प्रयत्न केले.

महिलांच्या संघर्षाला कायद्याचे समर्थन गरजेचे
कोर्ट म्हणाले : अनिता अपत्याचे संगोपनास तयार होत्या. परंतु सामाजिक परिस्थितीमुळे त्यांना परवानगी मिळाली नव्हती. एकट्या मातेसाठी या समाजात बालसंगोपन कठीण काम आहे. महिला अस्तित्वाला कमी लेखणाऱ्या शक्तींसह महिलांच्या संघर्षाला कायद्याचे समर्थन आहे, याची जाणीव राज्याने करून आत्मविश्वासाला बळ द्यावे त्यांचा सन्मान व्हावा.

‘स्त्रियांचा सन्मान नसलेल्या ठिकाणी चांगली कर्मे निष्फळ ठरतात’
देवीपूजा केल्या जाणाऱ्या देशात लोकांना स्त्रीबद्दल अनेक गोष्टी शिकवण्यात आल्या आहेत. त्यात “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः’ (मनुस्मृति (3.56) (अर्थात स्त्रियांची पूजा होत असलेल्या ठिकाणी देवतांचा वास असतो. स्त्रियांचा सन्मान नसलेल्या ठिकाणी चांगली कर्मेही निष्फळ ठरतात) अशा देशात महिलांबद्दलची वागणूक घृणास्पद आहे. एकट्या मातांसाठी कोणतेही आर्थिक किंवा सामाजिक सहकार्य नाही.
-न्या. ए. मोहंमद मुस्ताक , न्या. डॉ. कौसर एदप्पागाथ


बातम्या आणखी आहेत...