आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद:सिंगापुरात ‘द कश्मीर फाइल्स’वर बंदी; थरूर-अग्निहोत्रींमध्ये वाद

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे खासदार शशी थरूर पुन्हा एकदा आपल्या ट्वीटमुळे चर्चेत आले आहेत. ‘द कश्मीर फाइल्स’वर सिंगापूरमध्ये बंदी घालण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर थरूर यांनी ट्वीट केले आहे. भारतात सत्ताधारी पक्षाने तयार केलेल्या चित्रपटावर सिंगापूरमध्ये बंदी घातल्याचे त्यात म्हटले आहे. थरूर यांच्या या ट्वीटनंतर चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री व प्रमुख अभिनेता अनुपम खेर यांनी जोरदार टीका केली. अग्निहोत्री म्हणाले, सिंगापूरमध्येे रोमँटिक चित्रपटांवरही बंदी येते. थरूर यांनी वक्तव्यावर माफी मागावी. त्यातही दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर यांच्यासाठी त्यांनी हे करावे. त्या काश्मिरी हिंदू होत्या.

बातम्या आणखी आहेत...