आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Singapore Corona Strain Affects Latest News Update, Singapore Government Denied Arvind Kejriwal Allegations, Delhi CM Arvind Kejriwal

केजरीवाल यांना सिंगापूरचे उत्तर:सिंगापूर सरकारने म्हटले- आमच्याकडे कोणताही नवीन व्हेरिएंट नाही, भारताच्या नेत्यांनी वस्तुस्थितीवर बोलावे

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा दावा सिंगापूर सरकारने एका दिवसानंतर फेटाळून लावला आहे. केजरीवाल म्हणाले होते की, सिंगापूरमध्ये आढळून आलेला नवीन व्हेरिएंट लहान मुलांसाठी धोकादायक आहे. सिंगापूर सरकारने केजरीवाल यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, कोविडचा नवीन व्हेरिएंट सिंगापूरमध्ये सापडला यामध्ये काही तथ्य नाही. आमच्या देशात बहुतांश केसेसमध्ये कोरोनाचा बी .B.1.617.2 स्ट्रेनच जबाबदार आहे. त्यात मुलांचाही समावेश आहे. सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री विव्हियन बालकृष्णन म्हणाले की, राजकारण्यांनी वस्तुस्थितीवर बोलावे. सिंगापूर व्हेरिएंटसारखी कोणतीही गोष्ट आमच्या देशात नाही.

इकडे भारतीय मीडियामध्ये असा दावा केला गेला होता की, सिंगापूरमध्ये सापडलेल्या नवीन व्हेरिएंटमुळे भारतात तिसर्‍या लाटेला धोका निर्माण होऊ शकतो. सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्या व्हेरिएंटमुळे देशात केसेस वाढल्या आहेत, ते भारतात आढळून आलेल्या व्हेरिएंटचे एक रूप आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केला होता दावा
यापूर्वी मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी असा दावा केला होता की, सिंगापूरमध्ये आढळून आलेला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट मुलांसाठी अत्यंत धोकादायक आहे. भारतात तो तिसर्‍या लाटेच्या रूपात येऊ शकतो. त्यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली होती की, सिंगापूरसह विमान सेवा तातडीने रद्द कराव्यात. यासोबतच मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य द्यावे.

बातम्या आणखी आहेत...