आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sisodia, Once Honored As An Excellent Education Minister, Now Embroiled In Excise Controversy

चर्चेतील व्यक्तिमत्त्व - मनीष सिसोदिया:एकेकाळी उत्कृष्ट शिक्षणमंत्र्यांचा सन्मान, आता अबकारी वादात अडकले सिसोदिया

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जन्म : १५ जानेवारी १९७२, हापुड शिक्षण : भारतीय विद्या भवनमधून पत्रकारितेचा डिप्लोमा कुटुंब : पत्नी सीमा, मुलगा मीर मालमत्ता : सुमारे १ कोटी रु. विविध मीडिया रिपोर्ट््सनुसार

डॉक्युमेंटरी मेकर, रेडिओ जॉकी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि आता दिल्ली सरकारमध्ये उपमुख्यमंत्री. मनीष सिसोदिया यांची ही ओळख आहे. दिल्लीच्या नव्या अबकारी धोरणावरून सिसोदिया सध्या वादात आहेत. दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी सीबीआय चौकशीच्या शिफारशीत म्हटले आहे की, नियमांचे उल्लंघन आणि चुकांमुळे सरकारी तिजोरीचे १५० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. सामाजिक चिंता आणि शिक्षण क्षेत्रात केलेले प्रयोग व बदल यामुळे मनीष सिसोदिया यांची देश-विदेशात ओळख झाली आहे.

न्यूयॉर्क टाइम्स या अमेरिकन वृत्तपत्रानेही दिल्लीतील शाळांमधील बदलांबाबत एक वृत्त प्रसिद्ध केले. याशिवाय आयआयएम अहमदाबादमध्ये दिल्लीच्या शालेय शिक्षणाबाबत सत्रांचे आयोजन करण्यात आले. माहिती अधिकाराचा (आरटीआय) मसुदा तयार करणाऱ्या टीममध्ये सिसोदिया हेही होते, ते देशातील भ्रष्टाचाराविरुद्ध एक शस्त्र म्हणून डिझाइन केले गेले होते. आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला रेडिओ जॉकी असलेले सिसोदिया आजही रेडिओ कार्यक्रमांद्वारे दिल्लीतील लोकांशी संपर्क साधतात. त्यांना चित्रपट पाहण्याचीही आवड आहे. अमिताभ बच्चन व दिलीप कुमार हे त्यांचे आवडते कलाकार आहेत. सिसोदियांना बुद्धिबळ खेळायला आवडते.

करिअर : न्यूज रीडर म्हणून करिअरची सुरुवात केली पत्रकारितेचा डिप्लोमा केल्यानंतर सिसोदिया यांनी डॉक्युमेंटरी मेकर आणि न्यूज रीडर म्हणून करिअरला सुरुवात केली. सिसोदिया ऑल इंडिया रेडिओचा ‘झीरो अवर’ हा लोकप्रिय शो होस्ट करत असत. १९९८ मध्ये केजरीवाल यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सक्रियतेचे काम सुरू केले. २००६ मध्ये केजरीवाल यांच्यासोबत ‘पब्लिक कॉज रिसर्च फाउंडेशन’ या एनजीओची स्थापना केली. मात्र, त्यांची खरी ओळख २०११ मध्ये अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरोधात चालवलेल्या आंदोलनात सहभागी झाल्याने झाली. आंदोलन संपल्यानंतर सिसोदिया यांनी केजरीवाल यांच्यासोबत आम आदमी पक्षाची (आप) स्थापना केली. २०१३ मध्ये झालेल्या दिल्ली निवडणुकीत विजयी. मंत्री करण्यात आले. आता उपमुख्यमंत्री.

बालपण : सरकारी शाळेत शिक्षण, वडील शिक्षक होते मनीष सिसोदिया यांचे वडील धरमपाल सिसोदिया हे सरकारी शिक्षक होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण हापूड जिल्ह्यातील सरकारी शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी दिल्लीतील भारतीय विद्या भवनमध्ये प्रवेश घेतला. येथून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा केला. १९९८ मध्ये त्यांनी एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या सीमा सिसोदिया यांच्याशी लग्न केले. मात्र, काही काळानंतर सीमा यांनी नोकरी सोडली. त्यांना मीर सिसोदिया नावाचा मुलगा आहे. कवी कुमार विश्वास हे त्यांचे बालपणीचे मित्र. कुमार विश्वास आणि मनीष यांनी इयत्ता पहिलीपासून एकत्र शिक्षण घेतले आहे. एवढेच नाही, तर दोघांनीही त्याच वर्षी लग्न केले.

यश : ‘महात्मा’ या जागतिक पुरस्काराने सन्मानित २०१६ मध्ये इंडियन एक्सप्रेसने १०० सर्वात प्रभावशाली भारतीयांत समावेश केला. २०१७ माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट शिक्षणमंत्री पुरस्कार. २०१९ मध्ये चॅम्पियन ऑफ चेंज पुरस्कार महात्मा गांधींच्या स्वच्छता, समाजसेवा व सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात काम केल्याबद्दल देण्यात आला. हा सन्मान घटनापीठाद्वारे दिला जातो. २०२१ मध्ये ‘महात्मा’ या जागतिक पुरस्काराने सन्मानित. प्रभावी सामाजिक परिवर्तनासाठी चेंज मेकर्सना हा सन्मान दिला जातो.

वाद : ‘मन की बात’च्या काॅपीमुळे वादात सापडले -वर्ष २०१६ मध्ये ‘टॉक टू एके’ या मीडिया मोहिमेत नियमांच्या तथाकथित उल्लंघनप्रकरणी सीबीआयने त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. हा ‘मन की बात’ कार्यक्रमासारखा टॉक शो होता. -दिल्लीच्या जामिया युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान त्यांनी खोटी बातमी शेअर केल्याने दिल्ली न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली. व्हिडिओमध्ये त्यांनी दिल्ली पोलिसांवर डीटीसी बस जाळल्याचा आरोप केला होता. -लेखक चेतन भगत यांनी त्यांच्या फिनलंड दौऱ्याबाबत एक ट्विट केले होते, त्यानंतर मनीष यांनी ट्विटरवर त्यांच्याशी वाद घातला. त्यांनी चेतन भगत यांच्यावर बदनामी केल्याचा आरोप केला.

बातम्या आणखी आहेत...