आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीर:एकाच घरातून एकाच कुटुंबातील सहा मृतदेह मिळाले

श्रीनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमधील सिदरा येथे एकाच कुटुंबातील सहा जणांचे मृतदेह सापडले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी एका कुटुंबातील हे सदस्य त्यांच्या घरी संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळले.

सकीना बेगम, त्यांच्या दोन मुली नसीमा अख्तर आणि रुबिना बानो, मुलगा जफर सलीम आणि दोन नातेवाईक हबीबुल्लाचा मुलगा नूर-उल-हबीब आणि फारूकचा मुलगा सजाद अहमद अशी मृतांची नावे आहेत. सिदरा भागात एका घरात दोन मृतदेह सापडले आहेत, तर दुसऱ्या घरात चार मृतदेह सापडले आहेत. पोलिसांनी सांगितले की, मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...