आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Six Maharashtra Leaders Sworn In As Rajya Sabha MPs, While NCP Leader Faujia Khan Absent Due To Corona Test

राज्यसभा शपथविधी:महाराष्ट्रातील सहा नेत्यांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ, तर राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने अनुपस्थिती

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कराड, सातव, चतुर्वेदी यांनी मराठीतून, आठवले आणि उदयनराजे भोसलेंनी इंग्रजी तर शरद पवारांनी हिंदीतून घेतली शपथ

राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा आज शपथविधी सोहळा पार पडला. महाराष्ट्रातील 7 जणांची खासदारपदी नियुक्ती झालेली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते राजीव सातव, भाजप नेते छत्रपती भोसले, शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी आणि भाजपच्या भागवत कराड यांनी खासदारकीची शपथ घेतली आहे. तर माजी मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या उपस्थित नव्हत्या. दरम्यान आठवले आणि उदयनराजेंनी इंग्रजी, शरद पवारांनी हिंदी, तर भागवत कराड,राजीव सातव, प्रियंका चतुर्वेदी यांनी मराठीतून शपथ घेतली.

दिल्लीतील राज्यसभा सदनात हा शपथविधी सोहळा पार पडत आहे. यामध्ये महाराष्ट्रातून सात जणांची मार्च महिन्यात खासदारपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामधील केवळ सहा जणांनी शपथ घेतली आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान या कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्या आज शपथ घेऊ शकल्या नाहीत. उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांच्याकडून त्यांचे नाव पुकारण्यात आले. मात्र त्या गैरहजर राहिल्यानंतर पुढच्या सदस्याची शपथ घेण्यात आली.

महाराष्ट्रातील सात खासदार

> उदयनराजे भोसले – भाजप

> भागवत कराड – भाजप

> रामदास आठवले – भाजप पुरस्कृत

> शरद पवार – राष्ट्रवादी

> फौजिया खान – राष्ट्रवादी

> राजीव सातव – काँग्रेस

> प्रियंका चतुर्वेदी – शिवसेना