आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Six People, Including A Police Station In Charge In Lalitpur, Uttar Pradesh, Were Accused Of Raping A 13 Year Old Girl

संतापजनक:अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; दाद मागण्यासाठी गेलेल्या पीडितेवर ठाण्यातच पोलिसाकडून अत्याचार

उत्तर प्रदेश16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ललितपूरमध्ये सामूहिक अत्याचाराची तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर स्टेशन प्रभारीने अत्याचार केला आहे. पाली पोलिस ठाण्याचे स्टेशन प्रभारी तिलकधारी सिंह सरोज यांनी 13 वर्षीय पीडितेला तिचे जबाब नोंदवण्याच्या बहाण्याने पोलिस स्टेशनच्या एका खोलीत नेले, असा आरोप आहे. तिथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. चाइल्डलाइन एनजीओने पीडितेच्या समुपदेशनादरम्यान हा प्रकार उघडकीस आला. पिडितेच्या आईने पोक्सो कलमान्वये निरीक्षकासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी स्टेशन प्रभारीफरार आहे.

पोलिस ठाण्यात झालेल्या अत्याचाराच्या बातमीने ललितपूर ते लखनऊपर्यंत खळबळ उडाली आहे. एसपी निखिल पाठक यांनी इन्स्पेक्टरला निलंबित केले आहे. यानंतर एडीजी झोन ​​भानू भास्कर यांनी प्रकरणाचा तपास झाशी रेंजचे डीआयजी जोगेंद्र कुमार यांच्याकडे सोपवला आहे. तर 24 तासांत तपास पूर्ण करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, बुधवारी पीडितेचे मेडिकल करण्यात आले असून, न्यायालयात मुलीचे म्हणणे होऊ न शकल्याने तिला रुग्णालयातच दाखल करण्यात आले आहे.

भोपाळमध्ये 4 मुलांकडून अत्याचार, नंतर इन्स्पेक्टरने केला गुन्हा
मुलीच्या आईने सोमवारी चाइल्ड लाईन टीमला सांगितले की, 22 एप्रिल रोजी चंदन, राजभान, हरिशंकर आणि महेंद्र चौरसिया यांनी मुलीला आमिष दाखवून भोपाळला नेले होते. तेथे त्याने 3 दिवस तिच्यावर अत्याचार केला. यानंतर 25 एप्रिल रोजी चारही आरोपी मुलीला पाली शहर पोलिस ठाण्यात सोडून फरार झाले. पोलिसांनी मुलीच्या मावशीला बोलावून तिला ताब्यात दिले.

27 एप्रिल रोजी इन्स्पेक्टरने पोलिस ठाण्यात निवेदनासाठी बोलावले. जिथे त्याने संध्याकाळी उशिरा मुलीला आपल्या खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. 30 एप्रिल रोजी पोलिसांनी तिला पुन्हा पोलिस ठाण्यात बोलावले आणि मुलीला चाईल्ड लाईनमध्ये पाठवण्यात आले. जिथे चाइल्ड लाईनने पीडितेचे समुपदेशन केले तेव्हा तिने इन्स्पेक्टरच्या अत्याचाराबाबत सांगितले.

यानंतर आईने आरोपी पाली स्टेशन प्रभारी तिलकधारी सिंग सरोज, चंदन, राजभान, हरिशंकर, महेंद्र चौरसिया आणि पीडितेच्या मावशीविरुद्ध अत्याचार भादंवि कलम-363,376,376,120बी आणि पीडितेच्या मावशीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आतापर्यंत 2 आरोपींना अटक, फरार इन्स्पेक्टरचा शोध सुरू
यानंतर या संपूर्ण घटनेची तक्रार एसपींकडे त्या पीडितेने केली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तसेच यानंतर पोलीस प्रमुखाला निलंबित करण्यात आले आहे. तर स्टेशन प्रभारी आणि इतर आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिला जिल्हा न्यायालयात 164 नुसार जबाब देण्यासाठी पाठवण्यात आले आहे. यासोबतच आरोपी मावशीला पोलिसांनी अटक केली आहे.

महिला तक्रारी घेऊन कुठे जाणार? - प्रियांका गांधी

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ट्विट करत यूपी सरकारवर निशाणा साधला आहे. प्रियांका गांधी म्हणाल्या की, बुलडोझरच्या नादात कायदा आणि सुव्यवस्थेतील खऱ्या सुधारणा कशा दडपल्या जात आहेत. महिलांसाठी पोलिस ठाणेच सुरक्षित नसतील, तर तक्रारी कुठे घेऊन जाणार? असा सवाल प्रियांका गांधी यांनी विचारला आहे.

अखिलेश यादव घेणार पीडितेच्या कुटुंबियांची भेट
सपा प्रमुख अखिलेश यादवही पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी ललितपूरकडे रवाना झाले आहेत. यावेळभ् ते म्हणाले की, यूपीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. मुख्यमंत्री मोठमोठे दावे करतात, पण सत्य हे आहे की प्रशासकीय यंत्रणेवर त्यांचे नियंत्रण नाही. आता अत्याचाराच्या घटना घडवून आणणारे पोलिसच आहेत... असे म्हणत म्त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

डीजीपींनी अहवाल मागवला
एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी सांगितले की, यूपीचे डीजीपी मुकुल गोयल यांनी झाशीचे डीआयजी जोगेंद्र सिंह यांच्याकडून अहवाल मागवला आहे. यामध्ये त्यांनी पोलिस ठाण्यात अत्याचाराची घटना कोणत्या परिस्थितीत घडली, असा सवाल केला आहे. एवढेच नाही तर एसपीसह जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी केला आहे. ललितपूर अत्याचार प्रकरणावर उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक म्हणाले की, ही घटना अत्यंत दुःखद आहे. सरकार उच्चस्तरीय चौकशी करत आहे. गुन्हेगार कितीही शक्तिशाली असले तरी त्यांचा निभाव लागणार नाही, पीडितेच्या कुटुंबियाला न्याय मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू. आमचे सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे आहे.

याच ठाण्यात सापडला होता तरूणाचा मृतदेह
28 ऑगस्ट 2021 रोजी पाटुआ गावातील रहिवासी तेजराम यांचा मृतदेह पाली पोलिस ठाण्यातच लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणी तत्कालीन एसआय हरीश सिंग आणि पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. तेजराम दारू पिऊन गोंधळ घालत असल्याचा आरोप करण्यात आला. पोलिसांनी त्याला पकडून पोलिस ठाण्यात आणले. काही वेळाने तेजरामचा मृतदेह बाथरूमच्या ग्रीलला शर्टच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता यामुळे हे पोलिस स्टेशन याआधीही चर्चेत आले होते.

बातम्या आणखी आहेत...