आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Six Year Old Falls Into Borewell In Betul; Rescue Operations Update | Madhya Pradesh News

खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडला 6 वर्षांचा चिमुकला:हाताला दोरी बांधून 12 फूटवरती खेचले, पुन्हा 35 फुटावर अडकला

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेळता खेळता लहान मुले बोअरवेलमध्ये पडल्याची बरीच प्रकरणे याआधी समोर आली आहेत. अशीच एक घटना आता पुन्हा घडली आहे. मध्य प्रदेशच्या बेतूल जिल्ह्यातील आठनेर ब्लॉकच्या मांडवी गावात एक चिमुकला खेळताना बोअरवेलमध्ये पडला. 6 वर्षांचा वर्षांचा हा चिमुकला आहे. या मुलाच्या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडीओही समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बाळाच्या सुटकेसाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 53 फुट खोल हा बोअरवेल आहे.

मुलाला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. तीन जेसीबी मशीनच्या मदतीने बोअरवेलपासून 30 फूट अंतरावर समांतर खड्डा खोदला जात आहे. कलेक्टर अमनवीर सिंह बैंस यांनी सांगितले की, मुलाला हातात दोरी बांधून वर खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला. तो 12 फूट वर आला होता. मात्र त्याच दरम्यान दोरी सुटली आणि तो तिथेच अडकला. रात्री बारा वाजल्यापासून बाजूला नवीन खड्डा खोदण्याचे काम सुरू करून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

खेळत असताना अचानक पडला
मांडवी गावात मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, तन्मय मैदानात खेळत होता. याच दरम्यान त्याने बोअरवेलमध्ये डोकावण्याचा प्रयत्न केला असता तोल गेल्याने तो त्यात पडला. मूल न दिसल्याने सर्वजण बोअरवेलच्या दिशेने धावले. बोअरवेलच्या आतून मुलाचा आवाज आला. यावर कुटुंबीयांनी तत्काळ बैतूल व आठनेर पोलिसांना माहिती दिली.

बचावकार्य सुरू झाल्यानंतर, प्रथम मुलासाठी बोअरवेलमध्ये ऑक्सिजन पाईप टाकण्यात आला. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा बोअरवेलमध्ये सोडण्यात आला. SDERF च्या टीम घटनास्थळी हजर झाल्या आणि मुलाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

6 वर्षीय तन्मय दुसऱ्या वर्गात आहे. खेळत असताना सुमारे 400 फूट खोल बोअरवेलच्या खड्ड्यात पडला.
6 वर्षीय तन्मय दुसऱ्या वर्गात आहे. खेळत असताना सुमारे 400 फूट खोल बोअरवेलच्या खड्ड्यात पडला.

वडिलांकडून मुलाला धीर देण्याचा प्रयत्न

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, डीआयजी, एसपी, आयुक्त श्रीमान शुक्ला, तहसीलदार आठनर यांच्यासह पोलिस-प्रशासनाचे सर्व बडे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कुटुंबीयांना मुलाशी बोलण्यास सांगितले. वडीलांनी मुलाशी त्याला बोलून धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी 'इथे खूप अंधार आहे. मला भीती वाटते. लवकर बाहेर काढा', असे चिमुकला म्हणाला. तन्मय इयत्ता दुसरीत शिकतो. वडील सुनील दियाबर यांनी सांगितले की, त्यांनी 8 दिवसांपूर्वी शेतात 400 फूट खोल बोअर केला होता. त्यांचा मुलगा याच बोअरवेलमध्ये पडला आहे.

तन्मयसाठी आतमध्ये ऑक्सिजन पाइप टाकण्यात आला होता. यासोबतच त्याच्या वडिलांनाही त्याच्याशी बोलायला लावले.
तन्मयसाठी आतमध्ये ऑक्सिजन पाइप टाकण्यात आला होता. यासोबतच त्याच्या वडिलांनाही त्याच्याशी बोलायला लावले.

बचावकार्यात तीन जेसीबींचा सहभाग
जिल्हाधिकारी बैतुल अमनवीर सिंह बैंस यांनी सांगितले की, मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. घटनास्थळी तीन जेसीबी मशिन आहेत. घटनेची माहिती मिळताच तहसीलदारांना तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले.

अपडेट...

  • रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुसरा खड्डा खोदण्याचे काम सुरू करण्यात आले. पहिल्या खड्ड्यात दगड असल्याने दुसरा खड्डा खोदण्याचे काम सुरू करण्यात आले.
  • रात्री 11 वाजता हातात दोरी बांधून मुलाला वर खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला, मुलगा सुमारे 12 फूट वर आला होता. मात्र त्याच दरम्यान दोर सुटला आणि तो तिथेच अडकला.
  • रात्री 10.45 वाजेपर्यंत सुमारे 20 फूट खड्डा खोदण्यात आला होता. दुसरा खड्डा खोदण्याचे कामही सुरू करण्यात आले होते. जे काही वेळाने थांबविण्यात आले.
  • मुलाच्या सुटकेवर मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाकडून लक्ष ठेवले जात आहे, अधिकारी लक्ष ठेवून आहेत.
  • भोपाळ, नर्मदापुरम आणि हरदा येथील एसडीईआरएफ टीम बचावासाठी बैतूलमध्ये पोहोचली.
  • रात्री 9 वाजेपर्यंत बोअरवेलला समांतर 10 फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करून मुलाच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करून मुलाच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.

रेस्क्यू ऑपरेशनचे फोटोज...

गुजरातमध्ये शिवम 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला

गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यात शिवम हा दीड वर्षाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला. ही घटना ध्रांगध्रा तालुक्यातील दुदापूर गावातील शेतात घडली आहे. खेळता खेळता शिवम 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला. त्यावेळी त्याचे आई-वडील शेतात काम करत होते, मुलगा दिसत नसल्याने त्यांनी धाव घेतली. आजूबाजूला पाहिले असता बोअरवेलमधून मुलाच्या रडण्याचा आवाज येत होता. त्यांनी गावकऱ्यांना बोलावले. ग्रामस्थांनी पोलिस व प्रशासनाला घटनेची माहिती दिली. सुमारे 40 मिनिटांत सैनिकांनी त्या मुलाला बोअरवेलमधून बाहेर काढले. रात्री 10.45 वाजता मुलाला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेत नेऊन त्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बातम्या आणखी आहेत...