आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Six Year Old Raped By Neighbour In Delhi's Trilokpuri, Admitted To Hospital With Severe Injuries

दिल्लीमध्ये पुन्हा अमानुष कृत्य:त्रिलोकपुरी परिसरात 6 वर्षांच्या दलित मुलीवर सामुहिक बलात्कार; रडत-रडत घरी पोहोचली; 2 लोकांनी जबरदस्ती केल्याची घाबरतच दिली माहिती

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की दिल्ली पोलिस एफआयआर नोंदवण्यात विलंब करत आहेत.

पूर्व दिल्लीच्या त्रिलोकपुरी भागात बुधवारी रात्री एका 6 वर्षीय दलित मुलीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. कुटुंबाने पोलिसांवर एफआयआर नोंदवण्यास विलंब केल्याचा आरोप केला आहे.

मुलीचा एक नातेवाईक म्हणाला, 'ती रडत घरी आली. तिचे हात तिच्याच फ्रॉकने बांधलेले होते. ती म्हणाली की तिला दुखापत झाली आहे. प्रायव्हेट पार्टमधून रक्त येत होते. पुन्हा विचारल्यावर ती म्हणाला - दोन लोकांनी मला जबरदस्ती केली आहे. जर तु तोंड उघडले तर तुला जीवे मारु अशी धमकी त्या नराधमांनी मुलीला दिली होती'

पोलिसांवर दिरंगाई केल्याचा आरोप
मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की दिल्ली पोलिस एफआयआर नोंदवण्यात विलंब करत आहेत. ते म्हणत होते की यामुळे कुटुंबाची बदनामी होईल. मात्र, घटनेनंतर लगेचच एफआयआर नोंदवण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.

आरोपी विवाहित शेजारी आहे
डीसीपी प्रियांका कश्यप यांच्यानुसार, 'मुलीचे मेडिकल रात्री उशिरा करण्यात आले. तिची प्रकृती ठीक आहे. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही. त्याचा जबाब नोंदवला गेला आहे. 34 वर्षीय शेजाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी विवाहित आहे.

परिसरात फक्त काही घरे दलितांची आहेत
ज्या ठिकाणी बलात्काराची ही घटना घडली त्या भागात दलितांची काही घरे आहेत. बहुतेक लोक दक्षिण भारतीय आहेत जे दिर्घकाळापासून येथे वास्तव्य करतात. स्थानिक लोकांच्या मते, बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी देखील एक दक्षिण भारतीय आहे.

दोन आठवड्यांत अशी दुसरी घटना
गेल्या दोन आठवड्यांत दिल्लीतील अल्पवयीन दलितावर बलात्काराची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी कॅन्टच्या नांगल गावात एका दलित मुलीवर बलात्कार झाला होता. बुधवारी दुपारीच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत बांधलेल्या मंदिराच्या पुजाऱ्यावर बलात्काराचा आरोप आहे. या घटनेच्या विरोधात आजही येथे निदर्शने सुरू आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पीडितेच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

बातम्या आणखी आहेत...