आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sixth Visit Of PM In Two Months Congress Busy Digging Modi's Grave And We Called Pantpadhan Modi In Construction Of Expressway

पंतपधान मोदी म्‍हणाले:दोन महिन्यांत पीएमचा सहावा दौराकाँग्रेस मोदींची कबर खोदण्यात बिझी अन् आम्ही एक्स्प्रेस वे निर्मितीत पंतपधान मोदी म्‍हणाले

मद्दूर (कर्नाटक)14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक निवडणुकीच्या दोन महिन्यांआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यात ११८ किमी लांब बंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेस वेचे उद्‌घाटन केले. या मार्ग झाल्याने या दोन शहरांतील प्रवास तीन तासांऐवजी दीड तासांत पूर्ण होईल. पंतप्रधान मोदी यांचा २ महिन्यांतील सहावा कर्नाटक दौरा आहे. या दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, आज केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे कर्नाटक बदलत आहे. कोरोना काळातही कर्नाटकात जवळपास ४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. डबल इंजिन सरकारच्या या प्रयत्नांदरम्यान काँग्रेस माेदींची कबर खोदण्यात बिझी आहे अन् मोदी बंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेस वे निर्मितीत व्यग्र आहेत. काँग्रेस मोदींची कबर खोदण्यात व्यग्र आहे आणि मोदी गरिबांचे जीवन सुलभ करण्यात व्यग्र आहे.मोदी म्हणाले, २०१४ आधी काँग्रेस सरकारने गरीब कुटुंबांना नष्ट करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

बातम्या आणखी आहेत...