आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरातील सरकारे साेशल मीडिया प्लॅटफाॅर्मचा वापर आपल्या लाभासाठी करण्यात व्यग्र आहेत. त्यामुळेच अशा प्लॅटफाॅर्मवरील कंटेंट हटवणे, हेरगिरीपासून युजर्सचा खासगी डेटाच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याबद्दलची माहिती साेशल मीडियामधील दिग्गज ट्विटरने जाहीर केली आहे. डेटा मागण्याच्या बाबतीत अमेरिका क्रमांक एक स्थानी आहे. अमेरिकेनंतर भारताचा दुसरा क्रमांक लागताे. जुलै ते डिसेंबर 2021 दरम्यान जागतिक पातळीवर ट्विटरवर पत्रकार व माध्यम संस्थांकडून पाेस्ट करण्यात आलेली सामग्री हटवण्याची सर्वात जास्त मागणी भारतातून करण्यात आली. या कालावधीत स्थानिक, राज्य किंवा राष्ट्रीय सरकारच्या विक्रमी 60 हजार कायदेशीर मागण्यांवर कारवाई केली. ट्विटर अकाउंटवरून विशिष्ट सामग्री हटवण्यात यावी किंवा कंपनी युजरची गाेपनीय माहिती, लाेकेशन, संदेशांचे स्पष्टीकरण द्यावे. जागतिक पातळीवर मागण्यात आलेल्या माहितीमध्ये भारताची भागीदारी १९ टक्के हाेती.
जपानची 23 हजार वेळा मागणी
ट्विटरच्या म्हणण्यानुसार मागवण्यात आलेल्या सूचनेनुसार सुमारे ४० टक्के युजरच्या अकाउंटची माहिती शेअर केली आहे. जपानकडून सातत्याने अशी माहिती मिळावी यासाठी सातत्याने विनंती केली जाते. जपानने सामग्री हटवण्यासाठी २३ हजारपेक्षा जास्त वेळा विनंती केली आहे. रशियादेखील त्यात मागे नाही.
349 पत्रकारांचा कंटेंट हटवण्याची विनंती
पत्रकार व माध्यम संस्थांशी संबंधित ३४९ अकाउंटवरील विशिष्ट कंटेंट हटवण्याची मागणी करण्यात आली. आक्षेपाच्या अकाउंटची संख्या (जानेवारी ते जून २०२१) १०.३ टक्के जास्त आहे. या वाढीसाठी भारत (११४), तुर्की (७८), रशिया (५५), पाकिस्तान (४८) यांच्याकडून दाखल आहे.
खासगी माहिती हटवण्याचीही मागणी
भारताच्या राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडे एका अल्पवयीनाची खासगी माहिती संबंधी सामग्री देखील हटवण्याची मागणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे करण्यात आली आहे. कंपनीने कोणाचाही नामोल्लेख केला नाही. परंतु त्याचा संदर्भ काँग्रेसच्या माजी अध्यक्षांशी आहे.
अमेरिकेतून 20 टक्के मागणी
जून २०२१ दरम्यान साेशल मीडियाला युजर्सची अकाउंटसारखी माहिती देण्यासाठी जगभरातील विविध ठिकाणांहून आलेल्या विनंतीवर २० टक्के विनंती अमेरिकेतून करण्यात येत आहे. अशा सर्वाधिक मागण्या पाच देशांतून करण्यात आल्या.
भारताची फेसबुकला सूचना
फेसबुक व इन्स्टाग्रामची मालक कंपनी मेटानेदेखील याच काळात सरकारकडून युजरचा खासगी डेटा मागवल्याची माहिती दिली. फेसबुकच्या ट्रान्सपरन्सी अहवालानुसार २०१९ मध्ये भारताकडून ३९ हजार ६६४ अकाउंट्ससाठी २६ हजार ६९८ इत्यादी विनंती केली गेली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.