आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केदारनाथ शोकांतिका:7 वर्षापूर्वी दुर्घटनेत आपला जीव गमावलेल्या 4 लोकांचे सांगाडे सापडले, डीएनए सॅम्पलने होईल ओळख; अद्याप 3,183 बेपत्ता

केदारनाथ8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत सर्च ऑपरेशनमध्ये 703 लोकांचे अवशेष सापडले आहेत
  • 2013 च्या प्रलयात 10 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता

केदारनाथ दुर्घटनेत प्राण गमावलेल्या 4 जणांचे सांगाडे शोध मोहिमेदरम्यान सापडले आहेत. हे सांगाडे रामबारा ओलांडून हिमालयन मंदिराकडे सापडले आहेत. रुद्रप्रयाग एसपी नवनीत सिंह भुल्लर यांनी सांगितले की, या क्षेत्रात पोलिस आणि स्टेट डिजास्टर रिस्पॉन्स टीमकडून जॉइंट ऑपरेशन चालवले जात आहे.

त्यांनी सांगितले की, हिंदू पद्धतीने सांगाड्यांचा अंत्यविधी करण्यापूर्वी आरोग्य विभाग त्यांचे डीएनए सॅम्पल घेणार आहे. त्यांची ओळख पटवण्यासाठी दुर्घटनेदरम्यान बेपत्ता झालेल्या लोकांच्या कुटंबियांच्या डीएनसोबत ओळख पटवली जाईल.

सांगाडा सापडल्यानंतर सर्च ऑपरेशन संपले

भुल्लर यांनी सांगितले की, उत्तराखंड हायकोर्टाच्या निर्देशावर बुधवारी चालवलेले सर्च ऑपरेशन सांगाडा मिळाल्यानंतर संपले. यासोबतच आतापर्यंत सर्च ऑपरेशनमध्ये 703 जणांचे अवशेष सापडले आहेत.

दुर्घटनेत 10 हजारांपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला

केदारनाथमध्ये 14 जून 2013 ते 17 जून 2013 दरम्यान प्रचंड पाऊस झाला होता. ढगफुटी झाल्यानंतर चोराबाड़ी तलाप फुटून या भागात प्रचंड पाणी साचले होते. या दुर्घटनेत 10 हजार लोकांचा जीव गेला होता, तर 3 हजारांपेक्षा जास्त बेपत्ता झाले होते.

बातम्या आणखी आहेत...