आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Skill India Down In Rural Areas; The Number Of Trainees And Employers Also Declined | Marathi News

मुस्किल इंडिया:ग्रामीण भागात स्किल इंडियाचा उडतोय बोजवारा; प्रशिक्षण घेणारे, रोजगार मिळवणारेही घटले

नवी दिल्ली / पवनकुमार5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील ५.५ कोटी ग्रामीण युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य ही महत्त्वाकांक्षी योजना अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. गेल्या ४ वर्षांत स्किल इंडियाअंतर्गत येणाऱ्या या योजनेतून रोजगारासाठी प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांची संख्या ९० टक्के घटली आहे. ४ वर्षांपूर्वी १ लाख ३७ युवकांना रोजगार मिळाला होता. मात्र, आता ही संख्या फक्त २२ हजार राहिली आहे.

ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार, ४ वर्षांपूर्वी या याेजनेअंतर्गत २ लाख ४१ हजार ५०९ ग्रामीण युवकांना प्रशिक्षण दिले जात होते. आता ही संख्या २३ हजार १८६ वर आली आहे. अर्थात, सरकारने मात्र हे प्रशिक्षण घेतलेल्यांपैकी ९५ टक्के युवकांना रोजगार मिळवण्यात यश आल्याचा दावा केला आहे. उदाहरणादाखल, सरकारनुसार या योजनेअंतर्गत २३ हजारहून अधिक लोकांना गेल्या वर्षी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले आणि २२ हजार रोजगार मिळाले. प्रत्यक्षात वर्षभराची आकडेवारी पाहिली तर लक्षात येते की, प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांचीच संख्या ९० टक्के कमी झाली आहे. दरम्यान, कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्याच्या या महत्त्वाकांक्षी योजनेची स्थिती स्पष्ट झाल्यानंतर केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना याबाबत गांभीर्याने पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यांनी आकडे पाठवले तेव्हा वास्तव समोर आले
सूत्रांनुसार, ग्रामीण विकास मंत्रालयाने राज्यांकडून यासंबंधी सविस्तर आकडेवारी मागितली होती. माहिती केंद्राकडे आली तेव्हा कळाले की, प्रशिक्षणामुळे रोजगार मिळवलेल्यांची टक्केवारी ९० हून अधिक आहे. मात्र, युवकांचा सहभाग कमी होत आहे. आता मंत्रालयाने राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना जागरूकता अभियान, रोजगार मेळावे, विविध कंपन्यांसह नियोक्त्यांची बैठक घ्यावी, असेही निर्देश आहेत.

राज्यांनी पीछेहाटीचे कारण दिले कोरोना संसर्ग
राज्यांनी केंद्र सरकारला पाठवलेल्या अहवालात या घटत्या संख्येचे खापर कोरोनावर फोडले आहे. मात्र, आता परिस्थिती सुधारली असूनही ही राज्ये याचे स्पष्ट कारण सांगत नाहीत. राज्यांनी सांगितलेली कारणे :
- कोरोना संसर्गामुळे प्रशिक्षण देता आले नाही, ना रोजगार मेळावे झाले.
- अधिकारी लसीकरणासह इतर सरकारी कार्यक्रमांत अडकले.
- ग्रामीण युवकांसाठी ऑनलाइनचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला, परंतु पुरेशा यंत्रणेअभावी ते जोडले गेले नाहीत.
- जागकरूकता अभियानही थांबले. युवकांना माहितीच मिळू शकली नाही.

वार्षिक २ लाखांहून अधिक रोजगार मिळणे अपेक्षित
केंद्र सरकारने २०१४ मध्ये दीनदयाल उपाध्याय ग्रामीण विकास कौशल्य विकास ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. देशात ५.५ कोटी गरीब ग्रामीण युवकांना लघुउद्योगाचे प्रशिक्षण देऊन नोकरी मिळवता यावी किंवा स्थानिक पातळीवर स्वत:चा उद्योग उभारता यावा हा उद्देश होता. ६१० जिल्ह्यांत २५० हून अधिक औद्योगिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार होते. दरवर्षी २ लाख युवकांचे लक्ष्य होते. मात्र, ही योजना लक्ष्य गाठू शकलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...