आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अंदाजित तारखेच्या दोन दिवसांपूर्वीच यंदा केरळमध्ये मान्सून पोहोचल्याचा दावा खासगी हवामान एजंसी स्कायमेटने शनिवारी केला आहे. स्कायमेटच्या दाव्यानुसार, मान्सून 30 मे रोजी केरळमध्ये दाखल झाले आहे. भारतीय हवमान विभाग (IMD) ने 1 जूनला पाऊस केरळात धडकणार असल्याचे भाकित वर्तवले होते. या तारखेच्या दोन दिवसांपूर्वीच मान्सूनने हजेरी लावल्याचा सांगण्यात येत आहे.
हवामान विभागाने एप्रिलमध्ये सांगितले होते, की या वर्षी मान्सून सरासरी राहणार आहे. त्यानुसार, यावेळी 96 ते 100% पाऊस पडण्याचे भाकित वर्तवण्यात आले आहे. गेल्या वर्षी मान्सून 8 जून रोजी केरळच्या किनारपट्टीला धडकले होते. भारतात जून ते सप्टेंबरपर्यंत दक्षिण-पश्चिम मान्सून असते.
भारतासारख्या कृषी प्रधान देशाला मान्सून अत्यावश्यक आहे. अर्थव्यवस्थेचा मोठा भाग कृषी क्षेत्रावर आधारित आहे. देशातील निम्मेपेक्षा अधिक शेती केवळ मान्सूनवरच विसंबून आहे. भात, मका, ऊस, कापूस आणि सोयाबून सारख्या पिकांसाठी पाऊस अत्यावश्यक आहे. कोरोनामुळे देशभर लॉकडाउन आहे. त्यामुळे, भारतासह संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान झाले आहे. अशात मान्सून काहीसा दिलासा देणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.