आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Skymet Forecasts An Average Of 103 Per Cent Rainfall Across The Country This Year

शुभपर्जन्यमान:यंदा देशभरात सरासरी 103 टक्के पावसाचा अंदाज, स्कायमेटचे भाकीत, तिसऱ्या वर्षी दिलासा

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलग तिसऱ्या वर्षी मान्सूनमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. खासगी हवामान संस्था स्कायमेटने यंदा मान्सूनमध्ये १०३% पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. २०१९ मध्ये ११०% आणि २०१९ मध्ये १०९% पाऊस झाला होता. मान्सूनमध्ये सामान्यत: एखाद्या वर्षी चांगला पाऊस झाल्यास पुढील वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस असे चक्र असते. मात्र हवामानाच्या इतिहासात यापूर्वी १९९६ मध्ये १०३.४%, १९९७ मध्ये १०२.२% व १९९८ मध्ये १०४% पाऊस नोंदवला होता.

स्कायमेटचे वैज्ञानिक आणि उपाध्यक्ष महेश पलावत म्हणाले, जून ते सप्टेंबर या काळात देशात सामान्यपणे ८८०.६ मिमी पाऊस पडतो. यंदाच्या पावसाळ्यात ९०७ मिमी पावसाची शक्यता आहे. हे प्रमाण सरासरीच्या १०३% आहे. ९६ ते १०४% पाऊस झाल्यास मान्सून सरासरी श्रेणीत गणला जाताे. तथापि, या आकलनात ५ टक्क्यांची घट-वाढ होण्याचीही शक्यता पलावत यांनी व्यक्त केली आहे.

उत्तर-पश्चिमेकडील काही मैदानी भाग वगळता संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस
जूनमध्ये पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगण व आंध्र प्रदेशात चांगला पाऊस होईल. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पूर्व व उत्तर मध्य प्रदेशातही सरासरी पाऊस होईल. मात्र तामिळनाडू व उत्तर-पूर्व भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. उत्तर पश्चिमेकडील मैदानी भाग - पंजाब, हरियाणा, दिल्लीत तसेही मान्सून जूनच्या अखेरीस पोहोचतो. जुलैत महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा व आंध्र प्रदेशात चांगला पाऊस होईल. पश्चिम घाटावरील किनारपट्टीचा भाग- गोवा, कर्नाटकात सरासरीहून कमी पाऊस असेल. ऑगस्टमध्ये बिहार, झारखंड, ओडिशा, तेलंगण व आंध्र प्रदेशात बरा पाऊस पडेल. मात्र गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश व कोकणात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान व मध्य प्रदेशात सरासरीहून जास्त तर केरळ, कर्नाटक, आसाम व अरुणाचलात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

ला-नीना व इंडियन डायपोल परिस्थिती न्यूट्रल
स्कायमेटचे अध्यक्ष जी.पी. शर्मांनुसार, गेल्या मान्सूनमधील सकारात्मक ला-नीनाची स्थिती हळूहळू न्यूट्रल होत आहे. इंडियन डायपोल स्थितीही न्यूट्रल आहे. यामुळे त्याच्या मान्सूनवर दुष्परिणामाची शक्यता कमीच आहे.

बातम्या आणखी आहेत...