आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Slogans Like 'We Are Farmers, Not Terrorists', 'I Love Farming' Are In Farmers Protest

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:‘आम्ही शेतकरी, दहशतवादी नाही’, ‘आय लव्ह खेती’ सारख्या घोषणांमुळे शेतकरी आंदोलनामध्ये नवा जोश भरण्याचे काम

कुंडली सीमेवरून राजेश खोखरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदी, शहा, कंगनावर हल्ला करणारे पोस्टर जास्त; आंदोलनाचे पोस्टर, स्टिकर, टी-शर्ट ऑनलाइन उपलब्ध

शेतकरी आंदाेलनात विरोधाचे वेगवेगळे रंग दिसून येत आहेत. बॅनर, पोस्टर, स्टिकर आणि घोषणादेखील बहुभाषी आहेत. सरकारला आव्हान देणारी आंदोलकांची भाषा थंडीतदेखील आंदोलनात जोश भरण्याचे काम करत आहे. त्यांच्या निशाण्यावर पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, अभिनेत्री कंगना आहेत. त्यांच्याविरोधात हाय-हायच्या घोषणा आहेत. एवढेच नव्हे तर धडा शिकवण्याच्या पद्धतीदेखील घोषणाबाजी व पोस्टरमधून झळकू लागल्या आहेत. ‘उठ! हीरा उगाने वाले भाई, तेरी मेहनत लूट रहे कसाई’, अशी घोषणा मंचावरून ऐकायला मिळते. तरुण असो की वृद्ध किंवा महिला वर्ग, प्रत्येकाने आपापल्या घोषणा, पोस्टर तयार केले आहेत. शेतीविषयी आपुलकी दर्शवणारे ‘आय लव्ह खेती’ चे स्टिकर लक्षवेधी ठरले. आंदोलनात फुटीरवादी, नक्षली सहभागी असल्याचा आरोप झाल्यानंतर आंदोलकांनी घोषणाबाजीतून सरकारला उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

आम्ही शेतकरी आहोत. ‘वुई आर फार्मर, नॉट ए टेररिस्ट’, असे हिंदी, इंग्लिशमधून सांगितले जात आहे. हिंदीत या घोषणापत्राचे जोरदारपणे वाटप करण्यात आले आहे. ट्रॅक्टर-ट्रॉलीतून मंच, झोपणे-भोजनासारख्या ठिकाणी असे स्टिकर दिसतात. मुले हातांनी बनवताहेत पोस्टर : आंदोलनस्थळी लहान मुलांची संख्या खूप आहे. ते शेतकऱ्यांसाठी रोज हातांनी पोस्टर बनवतात. त्यात कार्टून व मिम्सचा प्रयोग केला जातो. एवढेच नव्हे तर शेतकरी आता आजूबाजूच्या प्रिंटिंग प्रेसवरून मोठ्या संख्येने पोस्टर तयार करून आणू लागले आहेत. कुंडली सीमेवर १० लाखांहून जास्त पोस्टर-स्टिकरचे वाटप करण्यात आले. दुसरीकडे ट्रॅक्टर-ट्रॉलीने लोक अजूनही पंजाबमधून येत आहेत. ते पोस्टरचा जास्त वापर करत आहेत. परिसरातील प्रिंटिंग प्रेस चालकांचे काम वाढले आहे. सोनिपतच्या एका प्रिंटिंग प्रेसचे काम करणारे सुंदर कुमार म्हणाले, विवाहाच्या हंगामातही एवढे काम नसते.

ऑनलाइन स्टिकर, टी-शर्ट :

शेतकरी आंदोलनात लावण्यात आलेले घोषणाबाजी व पोस्टरबाबतचा अंतिम निर्णय शेतकऱ्यांचा आयटी सेल करत आहे. सोशल मीडियावर ट्रेंड करण्याच्या दृष्टीने त्या दिवशी आयटी सेल पोस्टर तयार करून आंदोलनस्थळी पोहोचवतो. एवढेच नव्हे तर सोशल मीडियावर शेतकऱ्यांच्या काही घोषणा खूप लोकप्रिय झाल्या आहेत. ऑनलाइन संकेतस्थळांनीदेखील वेगवेगळे डिझाइन, स्टिकर, टी-शर्ट इत्यादी उपलब्ध करून दिले आहेत.

काही प्रचलित घोषणा

> आय लव्ह खेती।

> मैं भी किसान।

> हम किसान हैं, आतंकवादी नहीं/ वी आॅर फार्मर, नॉट ए टेररिस्ट।

> आय अॅम प्राउड फार्मर।

> नो फार्मर, नो फूड, नो फ्यूचर।

> हमें जवाब दो- यस या नो।

> किसान देश बचाने निकले हैं।

> तीनों काले कानून वापस लो।

> हमारी मांगे पूरी करो- तीनों कानून रद्द करो।

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser