आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Slow Poison, Wife Poisoned Her Husband In Mumbai; Mumbai Crime News | Crime News

नाश्त्यात विष, लंचमध्ये विष, डिनरमध्येही विषच:कुणी विवाहबाह्य संबंधांसाठी, तर कुणी पैशांसाठी घेतले आपल्याच प्रियजनांचे प्राण

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ती डायनिंग टेबलवर बसून आपल्या पतीसाठी जेवण लावत होती. तेव्हा तिच्या डोक्यात सुरू होता एक भयानक कट. पतीचे प्राण घेण्याचा...त्याच्यापासून कायम दूर जाण्याचा... ती खूप काळापासून आपल्या पतीपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत होती. पण कसे? हा प्रश्न तिला परेशान करत होता. अचानक तिच्या पतीने ब्रेकफास्ट मागितला व तिची तंद्री भंग पावली. पतीकडे ब्रेकफास्टची प्लेट सरकवत तिच्या डोक्यात प्रकाश पडला. तिला आयडिया सूचली - या जेवणातच विष मिसळले तर..!

जेवणात स्लो पॉयझन

मुंबईतील एका पत्नीने विष देऊन आपल्या उद्योजक पतीचे प्राण घेतले. तिची आपल्या प्रियकरासोबत राहण्याची इच्छा होती. यासाठी तिने आपल्या पतीचे विष देऊ प्राण घेतले. ही महिला गत अनेक दिवसांपासून आपल्या पतीच्या ब्रेकफास्ट, लंच व डिनरमध्ये विष मिसळत होती. पण पतीला त्याची भनकही लागली नाही. या कारस्थानापासून अनभिज्ञ असणारा हा व्यक्ती दररोज आपल्या शरीरात विष मिसळत होता. कुणालाही थांगपत्ता मिळाला नाही. काही दिवसांनंतर त्याची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू झाले. पण तोपर्यंत त्याचे सर्वच महत्त्वपूर्ण अवय निकामी झाले होते. अखेरीस त्याने या जगाचा निरोप घेतला.

थॅलियम (Thallium) देऊन घेतले प्राण

त्याला विष देण्यात आल्याची गोष्ट अनेक दिवसांपर्यंत कुणालाही समजली नाही. पण त्यानंतर तिच्या ननंदेच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि अंधारातील सत्य उजेडात आले. या महिलेने आपल्या पतीच्या जेवणात थॅलियम मिसळले होते. थक्क करणारी गोष्ट म्हणजे या उद्योगपतीसारखाच त्याच्या आईचाही काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. या महिलेने आपल्या सासूचाही असाच स्लो पॉयझन देऊन काटा काढल्याचा दावा केला जात आहे.

दिल्लीत थॅलियमच्या मदतीने 3 खून

दिल्लीतही गतवर्षी थॅलियमच्या मदतीने एका व्यक्तीने आपल्या पत्नीसह कुटुंबातील 3 जणांचा बळी घेतला होता. वरुण आपल्या सासुरवाडीत फिश करी घेऊन गेला होता. हे मासे त्याने आपली पत्नी, सासू-सासरे व एका मेहुणीला दिले. काही दिवसांनंतर अचानक कुटुंबातील सर्वच सदस्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर 3 जणांचा काही दिवसांच्या अंतराने मृत्यू झाला. पण वरुणच्या सासरा वाचला. त्याने त्याची पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तपासात आरोपांत तथ्य आढळ्लयानंतर वरुणच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला.

श्रीगंगानगरमध्येही थॅलियमच्या मदतीने हत्या

राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातही थॅलियमच्या मदतीने एक खून करण्यात आल्याची घटना उजेडात आली होती. एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर जेवणात थॅलियम मिसळून आपल्या सासऱ्याचा जीव घेतल्याचा आरोप केला आहे. या आरोपांनुसार, ती गत अनेक दिवसांपासून जेवणात स्लो पॉयझन मिसळत होती. यामुळे तिच्या सासऱ्याची प्रकृती बिघडली होती. याकामी तिने एका खासगी रुग्णालयातील कम्पाउंडरची मदत घेतल्याचेही स्पष्ट झाले होते.

थॅलियम बाजारात सहज उपलब्ध

मुंबईत घडलेल्या ताज्या प्रकरणातही तरुणीच्या प्रियकराने तिच्यासाठी थॅलियमची खरेदी केली होती. भारतात पोलोनियम मिळणे अत्यंत अवघड आहे. पण थॅलियम सहजपणे उपबल्ध होते. उंदीर मारण्याच्या औषधातही थॅलियमचा वापर केला जातो. सहजपणे उपलब्ध होत असल्यामुळे गुन्हेगार या प्राणघातक विषाचा अधिकाधिक वापर करतात.

काय असते थॅलियम?

थॅलियमनला स्लो पॉयझन म्हणूनही ओळखले जाते. हा अत्यंत सॉफ्ट प्रकारचा पदार्थ असतो. ग्रे कलरचा हे विष कोणत्याही पदार्थात सहजपणे मिसळते. पण हवेच्या संपर्कात येतोच त्याचा रंग उडून जातो. त्याला स्वतःची अशी कोणतीही चव नसते. यामुळेच ते जेवणात मिसळल्यानंतर चव बदलत नाही. तसेच त्याचा रंगही बदलत नाही. त्यामुळे गुन्हेगार त्याचा जेवणात वापर करून समोरच्याचे प्राण घेतात.

कसे काम करते थॅलियम?

थॅलियम घेतलेल्या व्यक्तीचा तत्काळ मृत्यू होत नाही. कारण, हा रासायनिक पदार्थ अत्यंत हळू-हळू काम करतो. त्याच्या सेवणामुळे हलकी डोकेदुखी, उलट्या व अतिसारासारखे लक्षणे उद्भवतात. त्यामुळे आपण विष प्राशन केल्याची बाब कुणाच्याही लक्षात येत नाही. पण हे विष हळूहळू मानवी अवयव निकामी करण्यास सुरुवात करते. सर्वप्रथम ते नर्व्ह सिस्टम कमकूवत करते. माणसाची विचार करण्याची शक्ती संपुष्टात आणते. यामुळे स्मरणशक्तीही दुबळी होते. यामुळे मांसपेशी दुबळ्या होऊन अशक्तपणा जाणवतो. एखाद्याला सलग 3 आठवडे हे विष दिले तर व्यक्ती कोमात जाण्याचीही भीती असते.

थॅलियमचे दुष्परिणाम कसे रोखायचे?

या स्लो पॉयझनपासून वाचणे अत्यंत अवघड असते. कारण, त्याच्या वापराने हळूहळू संपूर्ण मानवी अवयव निकामी होतात. पण ते घेतल्यानंतर काही तासांतच उपचार करण्यात आले तर व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. प्रशियन ब्ल्यू (Prussian Blue) त्याचे अँटी डॉट मानले जाते. पण व्यक्तीला पहिल्या काही तासांतच उपचार मिळणे गरजेचे असते. डायलिसीसच्या मदतीनेही किडनीतून विष बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. पण एकदा शरीरात मिसळल्यानंतर ते बाहेर काढणे फार अवघड असते.

काय आहे पोलोनियम (Polonium)-210?

पोलोनियम -210 ही एक प्राणघातक विष आहे. थॅलियमसारखाच त्याचा वापर केला जातो. त्याचाही स्वतःचा कोणता रंग व चव नसते. त्यामुळे ते ही जेवणातून दिले जाते. पण हे आपल्या देशात सहजपणे उपलब्ध होत नाही. पोलोनियमचा शोध मेरी क्यूरी यांनी लावला होता. हे विषय एवढे घातक असते की यामुळे त्यांच्या मुलीचाही मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. पोलोनियम-210 मुळेही व्यक्तीचे महत्त्वपूर्ण अवयव निकामी होण्याची भीती असते.

बातम्या आणखी आहेत...