आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅक्सिन:लसीकरणाची गती धीमी; कोरोनाचा वेग वाढू नये..., ढिलाई केल्यास नवे संकट उभे राहील : पंतप्रधान मोदींना चिंता

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक कोटी लसीकरणाचे उद्दिष्ट गाठल्यानंतर आपण ढिलाई केल्यास नवे संकट उभे राहू शकते, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिला. ५० टक्क्यांपेक्षाही कमी लसीकरण झालेल्या देशभरातील ४० जिल्हाधिकाऱ्यांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. या वेळी बोलताना मोदींनी प्रशासनाचे कौतुक केले.

देशभरात एकूण ४८ जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षाही कमी नागरिकांना लसीचा पहिला डोसही मिळालेला नाही. यामध्ये महाराष्ट्राचे ६ जिल्हे असून त्यात औरंगाबाद, नांदेड, हिंगोली, अकोला, बुलडाणा आणि नंदुरबारचा समावेश आहे. या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यांचे मुख्यमंत्री तसेच औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण उपस्थित होते. देशभरात किमान १०.३४ कोटी नागरिकांनी निर्धारित वेळेत कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. त्यामुळेच मोदींनी चिंता व्यक्त केली आहे.

कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी
- जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक परीक्षण समूहाने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला ‘आपत्कालीन उपयोगासाठी सूचिबद्ध ’ दर्जाची शिफारस केली.
- तांत्रिक सल्लागार समूह हा स्वायत्त सल्लागार गट असून कोविड-१९ च्या आपत्कालीन उपयोगाच्या मंजुरीचा निर्णय घेतो.
- जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता नसल्याने कोव्हॅक्सिन घेतलेल्या नागरिकांचे लस प्रमाणपत्र परदेश यात्रेसाठी मान्य केले जात नव्हते.
- आता कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांना परदेशातील नियमांचे पालन करून प्रवास करणे शक्य होणार आहे.

संतांची भूमी, १०० टक्के लसीकरण भूमी : चव्हाण
औरंगाबाद | शहरी तसेच ग्रामीण भागासाठी ‘मेरा वाॅर्ड, सौ प्रतिशत टीकाकरण वाॅर्ड’, ‘संतांची भूमी शंभर टक्के लसीकरण भूमी’ असे वेगवेगळे प्रयोग करून जिल्ह्यात शक्य तितक्या लवकर लसीकरण पूर्ण करणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या पहिल्या २५ गावांना विशेष निधी देण्यात येणार असून अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी शंभर टक्के लसीकरण करणार असल्याचे या वेळी चव्हाण म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...