आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Smriti Irani Criticized Rahul Gandhi; Over Amethi Loksabha Assembly | Rahul Gandhi

राहुल-सोनिया गांधींना स्मृती इराणींचा सल्ला:म्हणाल्या- तुम्हाला, मम्मीजींना आणि तुमच्या महिला विरोधी नेत्याला स्पीच रायटरची गरज

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल आणि सोनिया गांधी यांना त्यांच्या नेत्यांसाठी नवीन स्पीच रायटर नेमण्याचा सल्ला दिला आहे. स्मृती इराणी म्हणाल्या की, तुम्हाला (राहुल गांधी) आणि मम्मीजी (सोनिया गांधी) आणि त्यांच्या महिला विरोधी नेत्यांना (अजय राय) नवीन भाषण कौशल्य शिकविणाऱ्याची गरज आहे, अशी जोरदार टीका केली.

मुळात, उत्तरप्रदेश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणींवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अमेठीत येतात आणि निघून जातात. त्यांना यावेळेला अमेठीत लोक नाकारतील. यासोबतच त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत अजय राय यांनी दिले. तसेच 2024 मध्ये राहुल गांधी वाराणसीतून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देतील असेही त्यांनी सांगितले. काँग्रेस नेत्याच्या या वक्तव्यावर स्मृती इराणी यांनी जोरदार टीका केली आहे.

अमेठीच्या खासदार स्मृती इराणी म्हणाल्या- मी ऐकले आहे की, राहुल गांधी जी, तुम्ही 2024 मध्ये तुमच्या एका प्रांतीय नेत्याने अमेठीतून निवडणूक लढवण्याची अशोभनीय घोषणा केली आहे. मग मी तुमच्या अमेठीतून लढण्याचा नक्की विचार करू का? तुम्ही दुसऱ्या सीटवर निवडणूक लढण्यासाठी जाणार तर नाही ना? तुम्हाला भीती तर वाटणार नाही ना?

अजय राय नेमके काय म्हणाले
माजी आमदार आणि पूर्वांचलमधील एक मोठ्या नेत्यांपैकी एक असे अजय राय यांचे नाव आहे. त्यांनी- राहुल गांधी हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देतील. यासोबतच काँग्रेस नेत्याने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबाबतही वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राय म्हणाले की- स्मृती इराणी मतदारसंघात नुसत्याच येतात आणि हात वर करत निघून जातात. राहुल गांधी 2024 मध्ये अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवू शकतात, असे संकेत देखील त्यांनी दिले

राय यांच्या वक्तव्याला भाजपचा पलटवार

अजय राय यांच्या वक्तव्यावर भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी म्हणाले की, काँग्रेस पक्षात रस्सीखेच पेटली आहे, पण ताकद नाही. राहुल गांधींचाअमेठीतील लाजिरवाणा पराभव काँग्रेसला पचवता आला नाही, म्हणूनच त्यांचे नेते महिलांबाबत असे वक्तव्य करित आहेत. परिणामी यूपीमध्ये काँग्रेसकडे एक खासदार आणि दोन आमदार शिल्लक आहेत. काँग्रेसचे नेते असेच बोलत राहिले तर आगामी काळात त्यांना विजय मिळणे अशक्य आहे, 'लडकी हूं लड शक्ति हूं' मोहीम राबवणाऱ्या प्रियंका गांधी या आपले नेते व महिलाविरोधात बोलणारे अजय राय यांच्यावर काही कारवाई करतील का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

बातम्या आणखी आहेत...