आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Smugglers In Punjab, Drones Sent To Bring Weapons And Drugs From Pakistan | Marathi News

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:पंजाबमध्ये तस्करांचा कारनामा, पाकिस्तानातून शस्त्रे आणि ड्रग्ज आणण्यासाठी पाठवले ड्रोन

जालंधर / नरेंद्र शर्मा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानातून ड्रोनद्वारे पंजाबमध्ये हेरॉईन आणि शस्त्रे उतरल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण सीमा सुरक्षा दलाने (BSF) पकडलेल्या ड्रोनचा प्रयोगशाळेत नवा खुलासा झाला आहे. मार्च आणि एप्रिल 2022 मध्ये बीएसएफने ताब्यात घेतलेले दोन ड्रोन पाकिस्तानमधून नव्हे तर पंजाबमधून पाठवले गेले होते.

त्यानंतर तेथून हेरॉईन आणि पिस्तूल-मॅगझीन ड्रोनला बांधून पंजाबमध्ये आणले जात होते. बीएसएफने पंजाब पोलिसांच्या मदतीने तरनतारनच्या हवेलियान गावातील तस्कर जगजीत सिंग याला अटक केली. दिल्लीतील चांदनी चौकातून एक-दोन नव्हे, तर पाच ड्रोन खरेदी केल्याचे त्याने चौकशीदरम्यान उघड केले. हे ड्रोन तो घरातून पाकिस्तानात पाठवत असे.

असा झाला खुलासा
9 मार्च रोजी, बीएसएफने बीओपी हवेलियान अंतर्गत सीमेवर फॅंटम 4 प्रो ड्रोन पकडले. तपासात तस्कर जगजीत, त्याचे साथीदार हसनप्रीत सिंग आणि सुरजन सिंग यांना अटक करण्यात आली. लॅबमध्ये ड्रोनची तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांच्यामार्फत 6 खेप आणल्याचे मान्य केले. यादरम्यान जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये त्यांचे 5 पैकी 3 ड्रोन पाकिस्तानमध्ये पडले.

नोटेचा नंबर होता कोडवर्ड
हेरॉईन आणि शस्त्रास्त्रांच्या डिलिव्हरीनंतर जगजीत त्यांना हवालाद्वारे पैसे देत असे. त्यासाठी 10 रुपयांच्या नोटेचा क्रमांक पाकिस्तानात बसलेल्या तस्करांना सांगितला जात होता. तिथे हवालाशी संबंधित व्यक्ती नोटेचा नंबर जुळणी करून पैसे भरायचे.

बातम्या आणखी आहेत...