आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमाचलमध्ये 1.60 कोटींचे दागिणे जप्त:कारमध्ये लपवून घेऊन जात होते सोणे-हीऱ्याचे दागिणे; हरियाणा बॉर्डवर पोलिसांनी केले जप्त

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिमाचल प्रदेशात कोट्यवधींचे हीरे व दाग-दागिणे जप्त करण्यात आलेत. हिमाचल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर काहीजण हे दाग-दागिणे दिल्लीहून उत्तराखंडला घेऊन जात होते. पण हरियाणा बॉर्डरच्या पावंटा साहिबजवळच पोलिसांनी ते जप्त केले.

जिल्हा सिरमौरच्या पावंटा साहिबमध्ये पोलिसांची बहराल चेकपोस्टवर चेकिंग सुरू होती. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या टोयोटा कारची तपासणी केली असता तिच्यात दागिण्यांनी भरलेले बॉक्स आढळले. ड्रायव्हरकडे या दागिण्यांचे दस्तावेज मागण्यात आले असता त्याने आपल्याकडे कोणतेच कागदपत्र नसल्याचे सांगितले. त्याच्याकडे याचे बिलही नव्हते.

कार दिल्लीत नोंदणीकृत होती. तर दागिणे तस्करी करून हरियाणा व हिमाचल मार्गे उत्तराखंडच्या डेहराडूनला नेण्यात येत होते. उत्पादन शुल्क व प्राप्तिकर विभागाने विनादस्तावेज नेण्यात येणार्या या दागिण्यांवर दंड आकारला.

1.60 कोटींचे दाग-दागिणे

DSP उमाकांत ठाकूर यांनी या प्रकरणाची पुष्टी करत सांगितले की, चेक पोस्टवर पोलिसांनी DL 8CAB0439 क्रमांकाच्या कारची झडती घेतली. तिच्यातून 3.270 किलो हीरे व दागिणे जप्त करण्यात आले. या दागिण्यांची बाजारातील किंमत 1,60,50,708 एवढी आहे.

ड्रायव्हरने हे दागिणे करोल बाग, दिल्लीहून आणले होते. ते डेहराडूनला जात होता. पोलिसांनी दागिणे जप्त करून उत्पादन शुल्क विभागाकडे सोपवलेत. विभागाने त्याच्यावर 9 लाख 35 हजार रुपयांचा दंड लावला आहे.

बातम्या आणखी आहेत...