आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका तरुणाने प्रायव्हेट पार्टमधून पोटात साप शिरल्याचा बनाव केल्याची थक्क करणारी घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. या मद्यपी तरुणाच्या कुरापतीमुळे डॉक्टरांनीही डोक्याला हात मारून घेतला आहे.
सोमवारी रात्री वैद्यकीय महाविद्यालयाच्या आपत्कालीन विभागात पोहोचलेल्या तरुणाने कर्तव्यावर हजर डॉक्टरांना सांगितले की, शौच करताना एका सापाने त्याच्या प्रायव्हेट पार्टला चावा घतेला. त्यानंतर तो त्याच मार्गाने त्याच्या पोटात शिरला. तरुणाचा आरडाओरडा व स्थिती पाहून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची तपासणीही करण्यात आली. पण त्याच्या पोटात काहीच आढळले नाही. दुसऱ्या दिवशी त्याच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या ठिकाणी दाखवण्याचा बहाणा करून त्याला घरी घेऊन गेले.
त्याचे झाले असे की, सोमवारी रात्री 8.15 च्या सुमारास बनियानी पुरवा गावातील महेंद्र (25) नामक तरुण अत्यवस्थ स्थितीत हरदोई वैद्यकीय महाविद्यालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल झाला होता. त्याच्यासोबत त्याचे कुटुंबीयही होते. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, तरुण मोकळ्या मैदानात शौच करण्यासाठी गेला होता. तिथे शौच करताना एका काळ्या रंगाच्या सापाने त्याचा चावा घेतला. त्यानंतर तो महेंद्रच्या प्रायव्हेट पार्टमधून पोटात गेला.
तपासणीत काहीच संशयास्पद आढळले नाही
वेदनांनी विव्हळणाऱ्या तरुणानेही आपत्कालीन विभागात कार्यरत डॉक्टरांना ही गोष्ट सांगितली. त्यावर डॉक्टरांनी त्याच्या शरीरातील सर्वच भागांची तपासणी केली. त्यांना काहीच संशयास्पद आढळले नाही. पण त्यानंतरही त्यांनी पीडित तरुणाला दाखल करून वेदनाशामक औषधी दिली.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या आपत्कालीन विभागात कार्यरत डॉक्टर शेरसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाला मद्यपानाची सवय होती. नशा केल्यानंतर कधी-कधी त्याचे पोट दुखत होते. दारूच्या नशेत असेच काहीतरी बरळत होता. तिच गोष्ट त्याने आपल्या कुटुंबीयांना सांगितली.
दारूच्या नशेत बरळला
यामुळे घाबरलेले कुटुंबीय घाईगडबडीत त्याला घेऊन रुग्णालयात पोहोचले. दुसऱ्या दिवशी त्याचा सीटी स्कॅन करण्यात आला. त्यातही काही संशयास्पद आढळले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी दुसऱ्या डॉक्टरला दाखवण्याच्या नावाखाली सुट्टी घेऊन त्याला घरी घेऊन गेले. या तरुणाने दारूच्या नशेत साप आपल्या पोटात गेल्याचे सांगितल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.