आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka Election Result 2023 Live Updates; BJP Vs Congress | Basavaraj Bommai | PM Modi

गडबड गोंधळ:कर्नाटकचे CM बसवराज बोम्मई ज्या BJP उमेदवारासोबत करत होते बैठक, त्या घरात शिरला साप; माजला गोंधळ

बंगळुरू16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या कलांत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. त्यातच हावेरी मतदार संघातून एक विचित्र घटना घडली आहे. तिथे भाजप उमेदवार शिवराज सिंह सज्जन यांच्या निवासस्थानी साप शिरला. विशेष म्हणजे याच ठिकाणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई भाजपच्या नेत्यांसोबत बैठक करत होते. त्याचवेळी ही घटना घडल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी हा साप तत्काळ पकडून घराबाहेर काढला.

बोम्मईंना काँग्रेसच्या पठाण यांचे आव्हान

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई शिगगाव विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस उमेदवार यासीर अहमद खान पठाण यांनी त्यांना आव्हान दिले आहे. या जागेवर सर्वांची नजर आहे. सलग चौथ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या बोम्मई यांनी सुरुवातीच्या कलांत पठाण यांच्यावर आघाडी घेतली आहे.

सुरुवातीच्या कलांत काँग्रेसला स्पष्ट बहुमत

दुसरीकडे, कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. हे वृत्त लिहिपर्यंत सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसने 115 व भाजपने 79 जागांवर आघाडी घेतली होती. याशिवाय जेडीएसनेही 26 जागांवर आघाडी घेतली आहे. 224 सदस्यीय कर्नाटक विधानसभेसाठी गत 10 मे रोजी मतदान झाले होते. काँग्रेसने या निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजप सरकारला चौफेर घेरले होते. तर भाजपने विकास व त्यानंतर बजरंगबलीच्या मुद्यावर काँग्रेसला घेरले होते.

कर्नाटक निवडणुकीशी संबंधित खालील बातम्या वाचा...

कर्नाटक विधानसभेचा निकाल:आयोगाच्या कलांमध्ये काँग्रेस 95 जागांवर पुढे, 43.7% मते, भाजपला 64 जागांवर आघाडी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कलांमध्ये काँग्रेस 118, भाजप 75 आणि जेडीएस 25 जागांवर आघाडीवर आहे. अपक्षांच्या खात्यात 6 जागा जाताना दिसत आहे.

निवडणूक आयोगानुसार काँग्रेस 95 जागांवर, भाजप 64 जागांवर, जेडीएस 22 आणि अपक्ष 5 जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसला 43.7 टक्के, भाजपला 36.6 टक्के आणि जेडीएसला 11.8 टक्के मते मिळत आहेत.

जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी म्हणाले की, दोन ते तीन तास थांबा, सर्व काही स्पष्ट होईल. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जेडीएसशी संपर्क साधल्याच्या वृत्त त्यांनी फेटाळले. येथे वाचा संपूर्ण बातमी...

सावधगिरी:घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेस आपल्या आमदारांना रिसॉर्टमध्ये हलवणार? डीके शिवकुमार यांनी स्पष्टच सांगितले

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे शनिवारी (13 मे 2023) मतमोजणी सुरू आहे. आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले की, मी आपल्या आमदारांना कुठेही घेऊन जात नाही, जोपर्यंत विधानसभा निवडणुकीचे निकाल येत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचे काम करत राहू.

गुरुवारी आणि शुक्रवारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या दोन बैठका झाल्या. शुक्रवारच्या बैठकीनंतर पत्रकारांनी शिवकुमार यांना विचारले की, ते आपल्या आमदारांना रिसॉर्टमध्ये हलवत आहेत का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की नाही, सध्या ते फक्त निकालाची वाट पाहत आहेत. ते म्हणाले की आम्ही फक्त आमचे काम करत आहोत आणि आता निकालाची वाट पाहत आहोत. येथे वाचा संपूर्ण बातमी...

राजकारण:मोदी सरकारने लोकशाहीचा खून केला, कर्नाटकात 5 वर्षात भाजपचा भ्रष्टाचारी चेहरा समोर आला; नाना पटोलेंचा घणाघात

नरेंद्र मोदी सरकारने लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न केला. 5 वर्षात भाजप सरकारचे कामकाज पाहिल्यास कर्नाटक जनतेवर अत्याचार केले. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असे अनेक प्रश्न कर्नाटकमध्ये या 5 वर्षात निर्माण झाल्याचा घणाघात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ट्रेंडमध्ये काँग्रेसने बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. सध्या काँग्रेस 128 जागांवर आघाडीवर आहे, भाजप 77 आणि जेडीएस 17 जागांवर आघाडीवर आहे. एक जागा इतरांच्या खात्यात जात असल्याचे दिसून येत आहे. नाना पटोलेंनी या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...