आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पश्चिमी विक्षोभाचा परिणाम:हिमाचलमध्ये बर्फवृष्टी होणार; उत्तराखंड, जम्मूमध्ये पावसाची शक्यता

सिमला/नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
हे छायाचित्र हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पितीचे असून तेथे अधूनमधून बर्फवृष्टी होते - Divya Marathi
हे छायाचित्र हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पितीचे असून तेथे अधूनमधून बर्फवृष्टी होते
  • मार्चनंतर उत्तरेकडे जाणारे विक्षोभ दक्षिणेकडे आल्याने होतेय बर्फवृष्टी

पश्चिमी विक्षोभामुळे देशाच्या डोंगराळ भागातील  राज्ये जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश व उत्तराखंडात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडतो आहे. तर वरच्या प्रदेशात बर्फ पडतो आहे. शुक्रवारी ताजे पश्चिम विक्षोभ जम्मू-काश्मीर जम्मू-काश्मीरला येतील व शनिवारी निघून जातील. यामुळे जम्मू़़़-काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंडात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. हिमाचलसह डोंगराळ भागात आणखी बर्फवृष्टी होईल. पश्चिमी विक्षाेभामुळे हिमाचलच्या ६ जिल्ह्यात ऑरेंज व तर सहा जिल्ह्यांत यलो अॅलर्ट  जारी करण्यात आला आहे. याचा परिणाम पंजाब, हरियाणा, दिल्ली व तसेच पश्चिम उत्तर प्रदेशात होईल. येथे वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह विविध ठिकाणी पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. 

विक्रमी ६ पश्चिमी विक्षोभ दक्षिणेकडून आल्याने पारा घसरला

हवामान तज्ज्ञांनी सांगितले, मार्चनंतर येणारे पश्चिमी विक्षोभ साधारणपणे हिमालयाच्या उत्तरेकडून येतात. परंतु या वेळी मार्च महिन्यात येणारे विक्रमी सहा पश्चिमी विक्षोभ उत्तरेकडे जाण्याएेवजी दक्षिणेकडून आले. त्यामुळे डोंगराळ राज्यांपासून मध्य भारतापर्यंत तापमान घसरले. त्याबरोबरच पाऊस व अधूनमधून बर्फवृष्टी झाली. 

या महिन्यात राेहतांगमध्ये २५ सेंमी व केलांगमध्ये १८ सेंमी बर्फवृष्टी

हवामान खात्याचे सिमलाचे संचालक डॉ. मनमोहनसिंग यांनी सांगितले, एप्रिल महिन्यात सर्वाधिक बर्फवृष्टी रोहतांगमध्ये झाली. येथे २५ सेमी बर्फ पडला. केलांगमध्ये १६ सेमी, आदिवासी विभाग कल्पामध्ये २५ सेमी तर काझामध्ये १२ सेमी बर्फ पडला. या वर्षी जानेवारी महिन्यात कल्पा येथे १६८.४ सेमी बर्फ पडला. हा गेल्या ३० वर्षातला विक्रम आहे. यापूर्वी १९९४ मध्ये जानेवारी महिन्यात येथे १६४ सेंमी बर्फवृष्टी झाली होती. याच महिन्यात सिमल्यात १९९३ मध्ये १०९.४ सेंमी बर्फ पडला होता. 

बातम्या आणखी आहेत...