आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उत्तराखंडच्या औलीत या वर्षी सीनियर स्कीइंग नॅशनल चॅम्पियनशिप होणार आहे, पण एक समस्या निर्माण झाली आहे. दरवर्षी या वेळी बर्फाच्छादित असलेल्या औलीत बर्फच नाही. त्यामुळे चॅम्पियनशिपची तारीख जाहीर करता येत नाही. तथापि, हवामानातील या विसंगतीचा हा फक्त लहान परिणाम आहे. या वर्षी काश्मीरमध्ये विक्रमी बर्फवृष्टी होऊनही उत्तराखंड आणि हिमाचलच्या काही भागांत बर्फवृष्टी कमी झाली.
हवामान तज्ज्ञांच्या मते, पश्चिम चक्रवातामुळे तयार झालेल्या ढगांमुळे या वेळी काश्मीरमध्ये तर पाऊस झाला, पण हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये बरसण्याऐवजी ते कझाकिस्तानला गेले. त्याचा दूरगामी परिणाम असा होईल की उन्हाळ्यात तापमान सरासरी २ ते ३ अंश वाढू शकते.
विसंगती का दिसत आहे?
उत्तराखंड हवामान केंद्राचे संचालक विक्रम सिंह यांनी सांगितले की, दर ितसऱ्या-चौथ्या दिवशी भूमध्य सागरातून चक्रवात निर्माण होतो, त्यातून ढग तयार होऊन मध्यपूर्वेचे देश आणि पाकिस्तानवरून जात भारतात पोहोचतो. भारतात पोहोचण्यासाठी चक्रीवाताला खूप खाली राहावे लागते. पण या वेळी चक्रवात हायर अल्टिट्यूडमध्ये असल्याने ढग थेट मध्य आशियाकडे वळत आहेत. त्यामुळे काश्मीरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस आणि विक्रमी बर्फवृष्टी होत आहे, पण उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये सरासरीपेक्षा खूप कमी आहे.
परिणाम काय होणार?
शोधात असे समोर आले आहे की, ही स्थिती एप्रिलपर्यंत राहील. त्यामुळे हिमनद्यांत कमी बर्फ पडेल आणि खालचा बर्फ जास्त वितळेल. त्याचे दूरगामी गंभीर परिणाम होतील. उन्हाळ्यात हिमालयाचे सरासरी तापमान जास्त राहू शकते. त्यामुळे हिमनद्या वेगाने वितळतील आणि जलधारांच्या पाणीपातळीवरही परिणाम होईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.