आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Snowfall In The Mountains; Rain Elsewhere : Hail In Haryana Rajasthan, Rain In Some Places In Delhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पर्वतांवर बर्फवृष्टी; इतरत्र पाऊस:हरियाणा-राजस्थानात गारपीट, दिल्लीत काही ठिकाणी पाऊस

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केदारनाथचे कपाट बंद; बर्फवृष्टीमुळे 10 तास अडकले सीएम

पर्वतरांगात बर्फवृष्टी, इतर भागातील पावसाने उत्तरेत गारठा वाढला. उत्तराखंडात उंच क्षेत्रात बर्फवृष्टी सुरू आहे. हिमाचल प्रदेशातील मनाली, कुफरी येथे या मोसमातील पहिली, तर जम्मू-काश्मीरातील गुलमर्ग, पहलगाम, गुरेज, द्रासमध्येही बर्फवृष्टी झाली. केदारनाथमध्ये बर्फवृष्टीमुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत १० तास अडकले. हरियाणा-राजस्थानातील गारपीट, दिल्लीतील पावसामुळे तापमानही घसरले आहे.

महादेव निघाले उखीमठ, ६ महिने तेथेच राहणार

केदारनाथचे कपाट सोमवारी हिवाळ्यासाठी बंद केले. आता सहा महिन्यांसाठी भगवान महादेव उखीमठ येथेच राहतील.

बर्फवृष्टीचा इशारा

येत्या २४ तासांत जम्मू-काश्मीर खोरे, हिमाचल प्रदेशच्या पर्वतरांगांत तुरळक पाऊस, बर्फवृष्टीची शक्यता. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, अंदमान व निकोबार द्वीप समूह, कर्नाटकातील काही जागी अधिक तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडू शकतो.

बातम्या आणखी आहेत...