आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • So Far, 21 Crore Doses Of Corona Vaccine Have Been Applied In The Country, Maharashtra Is The Only State To Put 2 Crore Vaccines.

लसीकरणाचे 134 दिवस:देशात आतापर्यंत 21 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले, 2 कोटी लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यांकडे 1.82 कोटींपेक्षा जास्त डोस उपलब्ध

देशात लसीकरण सुरू होऊन 134 दिवस झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, देशात आतापर्यंत 21 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात 18 ते 44 वयोगटातील 14.15 लाख लोकांना पहिला आणि 9,075 जणांना दुसरा डोस मिळाला आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात झाल्यापासून 1.82 कोटी नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र देशातील एकमेवर राज्य आहे, जिथे 2 कोटींपेक्षा जास्त (2.20) लसीकरण झाले आहे. याशिवाय, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आणि बिहारमध्ये एक कोटींपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, बिहार, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशने 18 ते 44 वयोगटातील 10 लाखांपेक्षा जास्त लोकांना पहिला डोस दिला आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात 21.18 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात 98.61 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला, तर 67.71 लाख कर्मचाऱ्यांना दुसरा डोस मिळाला आहे.

याशिवाय, 15.55 कोटी फ्रंटलाइन वर्करला पहिला आणि 84.87 लाखांना दुसरा डोस मिळाला आहे. यात 18-44 वयोगटातील 1.18 कोटींना पहिला आणि 9,373 दुसरा डोस मिळाला आहे. 134व्या दिवशी सायंकाळी 7 वाजेपर्यंत 28.09 लाख डोस देण्यात आले. यात 25.11 लाखांनी पहिला आणि 2.98 लाखांनी दुसरा डोस घेतला.

देशातील लसीकरणाची स्थिती

ग्रुपएक डोसदोन डोस
हेल्थकेअर वर्कर्स98.61 लाख67.71 लाख
फ्रंटलाइन वर्कर्स15.55 करोड़84.87 लाख
18-44 साल1.18 कोटी9,373
45-60 वर्षे6.53 कोटी1.05 कोटी
60 पेक्षा जास्त वय5.84 कोटी1.86 कोटी

राज्यांकडे 1.82 कोटींपेक्षा जास्त डोस उपलब्ध

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे 1.82 कोटींपेक्षा जास्त डोस उपलब्ध आहेत. येत्या तीन दिवसात आणखी चार लाख डोस मिळतील. केंद्र सरकारकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 22.77 कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...