आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • So Far 420 Doctors Have Died Across The Country, With Delhi Having The Highest Number Of 100 Deaths

कोरोना मृत्यू:आतापर्यंत देशभरात 420 डॉक्टरांचा मृत्यू, दिल्लीत सर्वाधिक 100 डॉक्टरांनी जीव गमावला

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत महाराष्ट्रात 15 डॉक्टरांचा मृत्यू

देशात कोरोनाच्या लाटेत रुग्णांवर उपचार करताना बाधित झालेल्या ४२० डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यापैकी १०० डॉक्टरांचा दिल्लीत मृत्यू झाला.

इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए)ही माहिती दिली. दिल्लीनंतर सर्वाधिक डॉक्टरांचा मृत्यू बिहारमध्ये झाला. त्यानंतर उत्तर प्रदेशात ४१ डाॅक्टरांना प्राण गमवावे लागले.

संघटनेने राज्यवार दिलेल्या आकडेवारीनुसार गुजरात-३१, तेलंगणा-२०, पश्चिम बंगाल व आेडिशात प्रत्येकी १६ व महाराष्ट्रात १५ डॉक्टरांचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एवढ्या संख्येने डॉक्टरांचा मृत्यू झाल्याने सरकारसमोर अडचणी वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी आयएमएने जारी केलेल्या आकडेवारीत सर्वाधिक डॉक्टरांचे मृत्यू बिहारमध्ये झाल्याचे सांगण्यात आले होते. बिहारमध्ये आरोग्यदृष्ट्या पायाभूत सुविधांची कमतरता दिसून येते.

बातम्या आणखी आहेत...