आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • So Far In India 5,379 Cases Found, Army Postpones Commander Conference, UP Government Will Provide Insurance Cover Of 50 Lac To Police

देशात कोरोना:आतापर्यंत 5 हजार 749 प्रकरणे; दिल्ली-मुंबई-चंडीगड आणि यूपीमध्ये घराबाहेर पडल्यावर मास्क घालणे बंधनकारक, उल्लंघन केल्यास होणार कारवाई

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंदूरमध्ये 22 नवे संक्रमित मिळाले, चंदीगडमध्ये बाहेर जाताना चेहऱ्यावर मास्क लावणे आवश्यक

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 5 हजार 749 झाली आहे. बुधवारी महराष्ट्रात 71 नवीन रुग्ण सापडले. यासोबत राज्यातील संक्रमितांचा आकडा 1086 झाला आहे. मुंबईतील वांद्रा वेस्टमधील एका रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफने खराब क्वालिटीचे पीपीई किट दिल्याचा आरोप करत प्रदर्शन केले. प्रशासनाने दिल्ली-मुंबई-चंडीगड आणि यूपीमध्ये घराबाहेर पडल्यावर मास्क घालणे बंधनकारक केले आहे. या निर्णयाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दुसरीरकडे मध्य प्रदेशच्या इंदुररमध्ये 22 आणि आंध्रप्रदेशात 15 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. कोरोना संकटादरम्यान भारतीय लष्कराने 16 एप्रिलला होणाऱ्या द्विवार्षिक कमांडर कॉन्फ्रेंसला पुढे ढकलले आहे. तिकडे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना ड्यूटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी 50 लाख रुपयांचा विमा कव्हर देण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सकाळी 10 वाजता सांगितले की, मागील 24 तासांमध्ये देशभरात 773 नवे संक्रमित मिळाले आणि 35 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण संक्रमितांचा आकडा 5 हजार 194 झाला आहे, यांपैकी 401 रुग्ण बरेदेखील झाले आहेत. तसेच, covid19india.org वेबसाइटनुसार, मंगळवारी देशभारतामध्ये संक्रमणाची 573 नवी प्रकरणे समोर आली आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त 150 केस वाढल्या, येथे संक्रमितांची संख्या वाढून 1018 झाली आहे. तामिळनाडूमध्ये 69, दिल्लीमध्ये 51, तेलंगणामध्ये 40, राजस्थानमध्ये 42 आणि मध्यप्रदेशमध्ये 34 रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...