आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निधन:सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचे निधन, 2011 मध्ये अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी चळवळीत घेतला होता सहभाग

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वामींनी 1970 मध्ये आर्य सभा पक्षाची केली स्थापना, 1977 मध्ये हरियाणा विधानसभेत मिळवला विजय

सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचे शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. स्वामींची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना मंगळवारी दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बायोलॉजिकल सायन्सेस (आयएलबीएस) मध्ये दाखल केले होते. आज संध्याकाळी 6.55 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

मल्टिऑर्गन निकामी झाल्यामुळे स्वामींची प्रकृती खालावल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने गुरुवारी सांगितले होते. यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. डॉक्टरांनुसार स्वामी यकृताच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांना यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला देखील दिला होता.

1977 मध्ये हरियाणा विधानसभा निवडणुकीत स्वामींनी विजय मिळवला होता

स्वामी अग्निवेश यांनी 1970 मध्ये आर्य सभा पक्षाची स्थापना केली होती. 1977 मध्ये हरियाणा विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. त्यांनी हरियाणा सरकारचे शिक्षणमंत्री म्हणूनही काम पाहिले होते. स्वामी अग्निवेश 2011 मध्ये अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी चळवळीत सहभागी होते. पण नंतर ते यापासून दूर झाले.

स्वामींनी सलमान खानद्वारे होस्ट केला जाणार बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता. ते नोव्हेंबर 2011 मध्ये या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. मात्र तीन दिवसांतच ते घरातून बाहेर पडले होते.