आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आर्मीमध्ये 89 अॅप्स बॅन:आर्मी अधिकाऱ्याने फेसबूक वापरण्याची परवानगी मागितली, हायकोर्ट म्हणाले- फेसबूक महत्वाचे वाटत असेल तर नोकरी सोडून द्या

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हायकोर्ट म्हणाले- देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही

फेसबूक वापरण्याची परवानगी मागणाऱ्या एका आर्मी अधिकाऱ्याला दिल्ली हायकोर्टाने कडक शब्दात फटकारले. न्यायालयाने म्हटले की, जर तुम्हाला फेसबूक आवडत असेल, तर नोकरी सोडून द्या. अधिकाऱ्याने कोर्टात म्हटले होते की,एकदा फेसबूक डिलीट केल्यानंतर नंतर मित्रांशी कॉन्टॅक्ट होणार नाही.

अधिकाऱ्याने आर्मीमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह 89 अॅप्स बॅन केल्याविरोधात अपील केली होती. याप्रकरणी पुढील सुनावनी 21 जुलैला होईल आणि बेंचने अॅडिशनल सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांना पॉलिसीचे कागदपत्र सीलबंद लिफाफ्यात कोर्टात सादर करण्यास सांगितले आहे.

लेफ्टिनेंट कर्नल पीके चौधरी यांनी दाखल केली याचिका

जस्टिस राजीव सहाय आणि जस्टिस आशा मेनन यांच्या बेंचने बुधवारी लेफ्टिनेंट कर्नल पीके चौधरीच्या अपीलवर सुनावनी केली. चौधरी यांनी याचिकेत म्हटले की, न्यायालयाने मिल्ट्री इंटेलीजेंसच्या डायरेक्टर जनरलला निर्देश द्यावे की, आर्मी अधिकारी-जवानांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अकाउंट डिलीट करण्याचे आदेश परत घ्यावेत.

न्यायालयाने म्हटले- देशाच्या सुरक्षेसोबत तडजोड नाही

बेंचने अधिकाऱ्याला म्हटले की, तुम्ही निर्णय घ्या. आर्मीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर न करण्याची पॉलिसी आहे. हा निर्णय देशाच्या सुरक्षेला ध्यानात ठेवून घेण्यात आला आहे. तुम्हाला फेसबूक अकाउंट डिलीट करावेच लागेल.