आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Social Media New Guideline Updates: WhatsApp In Delhi High Court Against New It Rules ; News And Live Updates

सरकारचे प्रत्युत्तर:हे तर आदेशाचे उल्लंघन; आयटीच्या नव्या नियमांविरुद्ध व्हॉट्सअॅप दिल्ली हायकोर्टात

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारने 25 फेब्रुवारीला केली होती नव्या नियमांची घोषणा, 3 महिन्यांत लागू करायचे होते

व्हॉट्सअॅप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने माहिती तंत्रज्ञान (आयटी) नियम-२०२१ च्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटले आहे की, आयटीच्या नव्या नियमांमुळे गोपनीयता भंग होईल. त्यावर केंद्र सरकारने म्हटले आहे की, व्हॉट्सअॅपचा खटला स्पष्ट अवहेलनेचा (आदेशाचे उल्लंघन) आहे. आयटीच्या नव्या नियमांनुसार, एखाद्या मेसेजची सुरुवात कोणी केली हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने शोधणे आवश्यक आहे. व्हॉट्सअॅपच्या याचिकेत म्हटले आहे की, ‘एन्क्रिप्टेड मेसेजपर्यंत पोहोच प्रदान केल्याने गोपनीयतेचा भंग होईल. त्यामुळे गोपनीयतेच्या अधिकारांचे उल्लंघन होईल.’

व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्याने म्हटले की, ‘मेसेजिंग अॅपच्या चॅटवर लक्ष ठेवणे अत्यंत कठीण आहे. चॅट ट्रेस करण्यासाठी प्रत्येक मेसेजची फिंगरप्रिंट ठेवली जाऊ शकत नाही. आम्ही व्यवहार्य तोडगा काढण्यासाठी भारत सरकारशी चर्चा सुरू ठेवू.’ त्यावर केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, ‘सरकार गोपनीयतेच्या अधिकाराचा सन्मान करते. आम्ही त्याचे उल्लंघन करणार नाही. पण आमच्यावर राष्ट्रीय सुरक्षेची जबाबदारीही आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फक्त खूप गंभीर गुन्ह्यांसाठी ट्रेसिंग मेसेजच्या नियमांचे पालन करायचे आहे.’ सरकारने बुधवारी मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना नव्या आयटी नियमांच्या अनुपालनाचा अहवाल देण्यासही सांगितले. नव्या आयटी नियमांची घोषणा २५ फेब्रुवारीला करण्यात आली होती. सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना ते नियम तीन महिन्यांत लागू करण्यास सांगितले होते. त्याची कालमर्यादा बुधवारी संपली. पण कोणत्याही मोठ्या कंपनीने ते लागू केले नाहीत.

सरकारने ब्रिटन-अमेरिकेसारख्या देशांच्या नियमांशी केली तुलना
आयटी मंत्रालयाने म्हटले आहे की, ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडाच्या सोशल मीडिया कंपन्यांत सरकारला कायदेशीर हस्तक्षेपाची परवानगी आहे. त्या तुलनेत भारत सरकारी जी मागणी करत आहे ती खूप कमी आहे.

व्हॉट्सअॅपसारख्या प्लॅटफॉर्मकडून दुहेरी मापदंड : मोहनदास पै
इन्फोसिसचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी आणि आयटी उद्योगातील दिग्गज मोहनदास पै म्हणाले की, व्हॉट्सअॅपसारखे मीडिया प्लॅटफॉर्म दुहेरी मापदंडांचा अवलंब करत आहेत. या प्लॅटफॉर्मवर लोकांचा डेटा सुरक्षित नाही. आता या प्रकरणात न्यायालयच निर्णय देईल.

बातम्या आणखी आहेत...