आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Solar Air Conditioners Is Energy Efficient Also Cost Effective Particularly In Homes; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलर एअर कंडीशनर:इलेक्ट्रिक एसीच्या तुलनेत दर महिन्याला 2100 रुपयांची बचत होणार; वीज बिलातदेखील 90% घट

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा सोलर एसी 1 टन, 1.5 टन आणि 2 टन क्षमतेमध्ये उपलब्ध आहे

उन्हाळ्याची चाहूल लागताच घर, ऑफिस आणि इतर कामांच्या ठिकाणी एअर कंडीशनर (AC) लावला जात असतो. परंतु, यामुळे वीज बिलातदेखील मोठी वाढ होत असते. देशात सध्या एसी हे 2 स्टारपासून 5 स्टार रेटिंगपर्यंत उपलब्ध आहे. परंतु, या दोन्ही एसीच्या येणाऱ्या वीज बिलात जास्त काही फरक आढळत नाही. प्रत्येक व्यक्तींची इच्छा असते की, आपल्या घरात एसी असावा. परंतु, त्यामुळे येणाऱ्या वीज बिलामुळे लोकांना एसीचा उपयोग करणे परवडत नाही. दरम्यान, सध्या बाजारात एक सोलर एअर कंडीशनर आलेला आहे. विशेष म्हणजे या एसीची संपूर्ण प्रक्रिया ही सोलर प्लेटवर चालत असते. त्यामुळे आपल्या वीज बिलातदेखील 90 टक्के घट होऊ शकते.

हा सोलर एसी 1 टन, 1.5 टन आणि 2 टन क्षमतेमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्याला घरातील खोलीचा आकार आणि आवश्यकता यानुसार खरेदी करता येऊ शकतो. या सोलर एसीची किंमत इलेक्ट्रिक एसीच्या तुलनेत महाग आहे. परंतु, वीज बिलाचा विचार केल्यास हे खुपच स्वस्त आहे.

सोलर एसीची किंमत
भारत देशात सोलर एसी बनवणाऱ्या खूप साऱ्या कंपन्या असून जवळपास सर्वच कंपन्यांची किंमत एकसारखी आहे. हा सोलर एसी खरेदी केल्यास त्यासोबत सोलर प्लेट, इन्व्हर्टर, बॅटरी अन्य सामान मिळत असतात.

मॉडल (टन)सौर पॅनलकिंमत
1 टन1500 वॅट97,000 रुपये
1.5 टन1500 वॅट1,39,000 रुपये
2 टन3500 वॅट1,79,000 रुपये

पैसे वाचतील, बचत होईल
भारतातील विजेवरून चालणाऱ्या एसीची मोठी रेंज आहे. यात 2 स्टारपासून ते 5 स्टार रेटिंगवाले एसी आहेत. 2 स्टारचे वीज बिल जास्त येते, तिथेच 5 स्टारचे कमी येते. जर एसी 2 स्टार असेल तर फक्त एका रात्रीत 8 ते 10 यूनिट वीज वापरतो. म्हणजेच महिन्याला 250 ते 300 युनिट एक्स्ट्रा लागतात. दुसरीकडे 5 स्टार एसी हा 200 युनिटच्या आतच वीज वापरतो. वेगवेगळ्या राज्यांनुसार विजेच्या 1 यूनिटची किंमत असते.

सौर एसी कसा काम करतो?
सौर एसीच्या क्षमतेनुसार सोलर प्लांट बसवला जातो. उदाहरण घ्यायचे जर झाले तर 1 टन क्षमतेच्या सोलर एसीसोबत 1500 वॅटची सोलर प्लेट बसवली जाते. दरम्यान, इन्व्हर्टर आणि बॅटर ही प्लेटसोबत जोडली जाते. ही बॅटरी सूर्यापासून तयार होणार्‍या उर्जासह चार्ज केली जाते. सोलर एसी हा बॅटरीच्या सहाय्याने चालत असते. जर हवामान खराब असेल तर ते विजेवर देखील चालविले जाऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...