आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलार कॉलनी:राजस्थानातील सोलार पॉवर कॉलनी; घरोघरी होतेय गरजेप्रमाणे वीजनिर्मिती

भिलवाडा (राजस्थान)2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भिलवाडा येथील एका कॉलनीत बसवले सोलार पॅनल

छायाचित्र राजस्थानातील भिलवाडाचे आहे. येथील एका परिसरात प्रत्येक घरात सोलार पॅनल बसवले आहेत. घरोघरी गरजेनुसार वीजनिर्मिती होत आहे. यामुळे या परिसराला सोलार पॉवर कॉलनी म्हटले जात आहे. २०१६ मध्ये सरकारी धोरणांच्या सुरुवातीस औद्योगिक संस्थांमध्ये गरजेनुसार सौरऊर्जा प्लँट बसवणे सुरू झाले होते. सध्या बहुतांश औद्योगिक संस्थांमध्ये सौरऊर्जेवरच यंत्रे चालतात. तसेच स्वस्त वीज उपलब्ध होत असल्यामुळे आता घरोघरीही सौरऊर्जेचा वापर होत आहे. ३ वर्षांत शहरातील अनेक परिसर आता सौरऊर्जेमुळे उजळून निघाले आहेत. आर. के रिन्युएबल एनर्जीचे व्यवस्थापकीय संचालक उमेश विश्नोई सांगतात की, उद्योगांनंतर आता घरांमध्येही सौरऊर्जेचा वापर सुरू झाला आहे. वीज स्वस्त होण्यासह यामुळे तीन वर्षांत मूळ भांडवलाएवढा फायदा होतो. यामुळे कार्बन उत्सर्जनही कमी होते.

बातम्या आणखी आहेत...