आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Soldiers Deployed At A Temperature Of Minus 7 Degrees At An Altitude Of 17,000 Feet

धैर्याची दोन उदाहरणे...:मी हिमालय - उत्तरेत मी भारताचा सर्वांत मोठा रक्षक; आणि मी प्रहरी - मी जिवंत असेपर्यंत शत्रूला प्रवेश नाही

लेह2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 17 हजार फूट उंचीवर उणे 7 अंश तापमानात तैनात जवान

हरियाणाच्या जवानांची सुसज्ज अशी आयटीबीपीची तुकडी लडाखमध्ये १६ ते १७ हजार फूट उंचीवर तैनात ठेवण्यात आली आहे. आमचे जवान उणे ७ अंश सेल्सियस तापमानात सीमेवर गस्त घालत पहारा देत आहेत. येथे सतत थंडी व अनेक प्रकारचे हाय अॅल्टिटयूट धाेका (उंचावर राहणाऱ्यांना धोका) असतो. वेगवान प्रवाह असलेले नदी-नाले, जवानांच्या धैर्याची परीक्षा घेतात. यामुळे त्यांना हीमवीर म्हटले जाते. दैनिक भास्करकडे आयटीबीपीने हे छायाचित्र पाठवले आहे.

धैर्याची दोन उदाहरणे : 

मी हिमालय... : उत्तरेत मी भारताचा सर्वांत मोठा रक्षक. अटळ.. तटस्थ.. शतकांनुशतके... दिवसंरात्र.. सातत्याने बाहू पसरून उभा आहे..मी हिमालय...!

आणि मी प्रहरी... : देशाच्या सीमेवर पाय रोवून उभा आहे. आप्तांपासून हजारों मैल दूर. मी ऊन, वारा व पाऊस काही पाहत नाही. मी जिवंत असेपर्यंत शत्रूला प्रवेश नाही.

योग, अनुशासन व दृढ मनोधैर्याने स्वत:ला फिट ठेवतात

कोरोनाच्या काळात या जवानांनी योग, अनुशासन व दृढ मनोबल ठेवत स्वत:ला फीट ठेवतात. ते सतत शारिरिक व्यायाम करतात. प्रतिकारशक्ती टिकून ठेवतात. ते प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी स्वत:ला तयार ठेवतात. त्यांचे शारिरिक व मानसिक धैर्य कौतुकास्पद असते.

बातम्या आणखी आहेत...