आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकॉलेजियम अत्यंत अपारदर्शक पद्धतीने काम करते. न्यायाधीशांविरोधात एखादा आरोप समोर आल्यास सहसा कोणतीच कारवाई करत नाही, असे सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती चेलमेश्वर यांनी सांगितले. ते स्पष्ट म्हणाले की, काही न्यायमूर्ती आळशी आहेत. ते वेळेवर निर्णयही लिहीत नाहीत. त्यांना निर्णय लिहिण्यासाठी अनेक वर्षे लागतात. काहींना तर कामही करता येत नाही.
केरळातील कोचीनमध्ये परिसंवादात बोलत होते
केरळातील कोचीनमध्ये ‘कॉलेजियम राज्यघटनेपेक्षा वेगळे आहे का?’ या विषयावर आयोजित परिसंवादात चेलमेश्वर बोलत होते. ते पुढे म्हणाले, कॉलेजियमसमोर सर्व प्रकरणे येतात, पण काहीच होत नाही. आरोप गंभीर असले तर कारवाई केली पाहिजे. ज्या न्यायाधीशांवर आरोप आहे त्यांची बदली करण्यात यावी, ही सामान्य पद्धत आहे. मी काही म्हणालो तर ते न्यायपालिकेला त्रास देत आहेत, असे म्हणत मला निवृत्तीनंतर ट्रोल केले जाईल. मात्र, हे माझे नशीब आहे.
कॉलेजियम पद्धत अवैध, हा युक्तिवादही हास्यास्पद
कायदेमंत्री किरेन रिजिजू यांच्या ४२व्या घटना दुरुस्तीवरील वक्तव्याबाबत न्या. चेलमेश्वर म्हणाले, ‘सामान्य माणसाला फायदा होण्याच्या दृष्टीने कॉलेजियम पद्धत कशी बळकट होईल, यावर कुणाचेच लक्ष नाही.’ रिजिजू म्हणाले होते की, मूलत: राज्यघटनेत हा अधिकार कार्यपालिकेला (सरकार) दिला आहे. सध्याच्या व्यवस्थेत न्यायाधीशांची नियुक्ती कॉलेजियम प्रणालीच्या माध्यमातून केली जाते. कॉलेजियम पद्धत अवैध आहे, हा युक्तिवादही हास्यास्पद आहे. कारण या शब्दाला घटनेत स्थान मिळाले नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.