आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Some Madrassas In Assa Are Linked With Terrorist Organizations In Bangladesh, Al Qaeda's Agenda Is Being Implemented

ग्राउंड रिपोर्ट:आसामध्‍ये काही मदरशांचा बांगलादेशातील दहशतवादी संघटनांशी संबंध, अल कायदाचा अजेंडा राबवला जातोय

आदित्य डी. | गुवाहाटीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आसामच्या काही मदरशांमध्ये अतिरेकी कारवायांची लिंक समोर आली आहे. मदरशांमध्ये कुख्यात अल कायदाचा अजेंडा पसरवण्यात बांगलादेशची अतिरेकी संघटना अन्सार बांगलाचा हात असल्याचे सुरक्षा संस्थांनी उघड केले आहे. बारपेटामध्ये अन्सार बांगलासाठी काम करण्याच्या आरोपात अटक केलेल्या २८ वर्षीय आरोपीने गौप्यस्फोट केला आहे. त्याने सांगितले की, बांगलादेशातून आलेले जिहादी आसाममध्ये मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचे मदरशांत सांगतात.

बारपेटाचे पोलिस अधीक्षक अमिताभ सिन्हा म्हणाले, अन्सार बांगला अल कायदाचा फ्रंट ग्रुप आहे. हा त्याच्या अजेंड्यावर काम करतो. बांगलादेशमध्ये या संघटनेवर २०१५ पासून बंदी आहे. यानंतरच ही अतिरेकी संघटना भारतात सक्रिय झाली. बोंगाईगाव जिल्ह्याचे एसपी स्वप्निल डेका यांच्यानुसार, अल कायदाच्या नेटवर्कचा पर्दाफाश केल्यानंतर येथे एका मदरशातील शिक्षकालाही अटक केली आहे. ग्वालपाडात केलेल्या अनेक कारवायांत पोलिसांनी अल कायदा नेटवर्कशी संबंधित पुस्तके आणि अन्य सामग्रीही जप्त केली. पोलिसांचे काम मदरसा तोडणे नाही. मात्र, एखाद्या मदरशात जिहादी कारवायाशी संबंधित लिंक आढळल्यास कारवाई होईल. आसममधील काही मदरशांविरुद्ध केलेल्या कारवाईचे समर्थन करणारे आसामचे मुख्यमंत्री बिस्वा सरमा म्हणाले, आसाम जिहादी कारवायांचा अड्डा झाला आहे. अतिरेकी संघटना अन्सार बांगलाशी(एबीटी) संबंधित ५ मॉड्यूलचा पाच महिन्यांत भंडाफोड झाला आहे. राज्यात मदरशांच्या पाडापाडीलाही विरोध होत आहे. मरकज-उल-मा- आरिफ कुरियाना मदरसा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुशर्रफ हुसेन म्हणाले, सरकारने मदरसे पीडब्ल्यूडीच्या नियमांविरुद्ध असल्याचे सांगत पाडले. मात्र, बांधकामात सर्व नियमांचे पालन केले. हुसेन यांच्या म्हणण्यानुसार, लोकांच्या पैशातून बांधलेले मदरसे पाडणे अन्यायकारक आहे. मदरशातील शिक्षक नुरुल अमीन म्हणाले, मदरशात मुलांना कुराण हदीस व इस्लामच्या शिक्षणासह शालेय अभ्यासक्रम शिकवला जातो. दरगाह अलगा गावातील रोशन अली(बदललेले नाव) म्हणाले, अतिरेक्यांशी साटेलोटे असल्याच्या नावाखाली पोलिस मुस्लिमांना त्रास देत आहेत.वकील हाफिज रशीद अहमद म्हणाले, अतिरेक्यांवर कारवाई व्हावी, मात्र मदरशे पाडणे चुकीचे आहे. जिहादी कारवायांमुळे बोंगाईगाव, बारपेटा, मोरीगाव जिल्ह्यांतील मदरसे उद्‌ध्वस्त केले.

मुस्लिम विद्यार्थी संघटनांनी केला विरोध मदरशांच्या पाडापाडीच्या कारवाईविरोधात ऑल आसाम मायनॉरिटी स्टूडंट्स युनियनने(आम्सू) गुवाहाटीमध्ये आंदोलन केले. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना पाठवलेल्या निवेदनात आम्सूने नमूद केले की, सरकार धार्मिक शैक्षणिक संस्था नष्ट करून मुस्लिम समाजाच्या भावनांना ठेच पोहोचवत आहे. दुसरीकडे, राज्यात भाजपचे ज्येष्ठ नेते विजयकुमार गुप्ता म्हणाले, मुस्लिमांविरुद्ध राजकारण केल्याचा आरोप निराधार आहे. सरकार राज्यातील जिहादी कारवायांत गुंतलेल्या लोकांविरुद्ध कारवाई करत आहे. जिहादींना आश्रय देणारे किंवा त्यांना मदत करणाऱ्यांविरुद्ध कोणत्याही भेदभावाशिवाय कारवाई केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...