आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Some More Vaccines Will Be Available In The Country In 2 Months, Said AIIMS Director Dr. Randeep Guleria

लसींचे उत्पादन:देशात 2 महिन्यांत आणखी काही लसी उपलब्ध होणार, एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांची माहिती

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील इतर काही कंपन्या लवकरच लसींचे उत्पादन सुरू करतील. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत देशात मोठ्या प्रमाणात लसी उपलब्ध होतील, असे भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे “एम्स’ संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.

जागतिक पातळीवर असो किंवा देशात, लसीचा काही प्रमाणात का होईना तुटवडा जाणवणार असला तरी शक्यतो दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होईल. कारण, लसीची निर्मिती करणाऱ्या कंपन्या देशात निर्मिती सुरू करतील. शिवाय, बाहेरूनही देशाला लस मिळू लागेल. कोविशील्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक-व्ही या लसींचे उत्पादन भारतात जास्तीत जास्त कंपन्यांत सुरू केले जाईल.

“स्पुटनिक-व्ही’ने यासाठी अनेक कंपन्यांशी करार केलेला आहे. त्यामुळे जुलै-ऑगस्टपर्यंत पुरेशी लस मिळेल, असे गुलेरिया म्हणाले. प्रत्येकाला एक-दोन दिवसांत लसीकरण शक्य नाही. त्यासाठी आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्याची गरज आहे. कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवडे करण्याबाबत गुलेरिया यांनी ब्रिटनचे उदाहरण दिले.

बातम्या आणखी आहेत...